पान:मयाची माया.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माबा. साठीच मी तझ्याकडे आलो आहे असें मी त्याला अमदीं खोटेंच सांगितलें. त्याची व माझी गांठ पडण्यापूर्वी मनामध्ये थोडीशी शंका उत्पन्न होऊन - शिरीनच्या पत्रांत तिने आपल्या भेटीला येण्याची वेळ कोणती लिहिली आहे, तीन की साडेतीन है गर्दीत बरोबर ध्यानांत न राहिल्यामुळे त्याबद्दलची मनाची एकदां खात्री करण्यासाठी मी शिरीनचें पत्र पुन्हां उघडून कांहीं वेळ रस्त्यांतच वाचीत बराच वेळ उभा राहिलों होतां. त्यावेळी माझ्या मनाला विलक्षण मोह पाडणारे ते पत्र मी दोन तीन, नव्हें किती तरी वेळां वाचून पाहिले असेल ! त्या पत्रानें मला इतका कांहीं आनंद झाला कीं सांगता येत नाहीं. शिरीनला वश करण्यासंबंधाची संध्याकाळपासून माझ्या मनांत उत्पन्न झालेली हांव, दुष्ट वासना, कांहीं झालें तरी तृप्त केल्या. शिवाय रहावयाचें नाहीं असा मी ठरविलेला निश्चय तिचें तें पत्र हाती येण्यापूर्वी किंचिद् लटपटल्याचा मला भास होत होता. पण त्या निश्च याला डळमळविणाऱ्या सर्व प्रतिकूल कल्पना आतां एकाएकी नाहींशा झाल्या. व त्या निश्चयाला आतां एक प्रकारचे विलक्षण उत्तेजन मिळालें, असे मला वाटू लागून ज्या संकटाच्या कल्पनेने मी घाबरून गेलो होतों; ज्या माझ्या प्रिय हेतूच्या सिद्धिविषय माझ्या मनांत जबरदस्त शंका उत्पन्न झाली होती तें संकट आणि इष्टहेतू संबंधाची ती निराशा आतां एकदम कोठल्या कोठें गेली हैं. मला समजलेंही नाहीं ! कोणताही मनुष्य एखाद्या कार्याच्या -- मग ते बरें अथवा वाईट कसंही असो- पूर्णपणे नादी लागला आणि त्या बाबतींत त्याला उत्तेजन देणारी अशी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट जरी घडून आली - निदान तसे झाल्याचें कल्पनेनें जरी त्याला वाटले तरी त्याला केवढा आनंद होतो व किती विलक्षण अवसान चढत असते. पण या आनंदाच्या भरांत आपण करा- वयास निघालेले कृत्य कसे काय आहे. त्याच्या योगाने आपले किं दुसऱ्या कोणाचे नुकसान होण्याचा संभव आहे की काय, वगैरे विचार- कोणत्याही कार्याच्या सिद्धीला अवश्य असणारे विचार - तो सहसा मनांत आणीत नाहीं. आणि अविचाराने टाकलेले पाऊल मार्गे न घेतां तो आपला नाश करून घेण्याला प्रवृत्त होत असतो ! ५९