पान:मयाची माया.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ३ एकाच ठिकाणी दहादहा वेळ येऊन पहात रहाण्याचा माझा क्रम चालला होता. अशा स्थितीत किती काळ निघून गेला याचें मला देहभान राहिले नाहीं. हळु हळु लोकांची गर्दी कमी होऊ लागली. धुळीच्या अभ्रानें व्याप्त झालेल्या त्या फेट्रमध्यें विद्युल्लतेप्रमाणे चमकणाऱ्या युवतिजनांचा समुदाय तर अगदींच विरळ झाला असें पाहून आतां आपल्या बिव्हाडाकडे बळावे असा विचार करून मी परत निघालों. इतक्यांत हजारों डोळ्यांची जिच्यावर टक लागली आहे अशी एक पारशी तरुणी एकटीच फिरत असतांना मला दिसली. आजपर्यंत फेटमध्यें मीं तिला बरेच वेळ पाहिलें होतें व आजही यापूर्वी ती मला दोन तीन वेळ दिसली होती. परंतु गर्दीमध्ये चंद्रिकेप्रमाणे मेघा आड होत असलेली ती निश्चलपणे कधींच पहावयास मिळाली नव्हती. तेव्हां आतांची संधी अनुकूल असल्यामुळे विशेष बारकाईनें निरीक्षण करीत तिच्या बाजूबाजूनें अडखळत अडख- ळत, पहात पहात असा मी चाललो होतो. जातां जातां एकेठिकाणीं एक कारंजें होतें. त्याचेपाशीं ती येऊन उभी राहिली. ह्या कारंज्याच्या तळाशीं लहान लहान विजेचे दिवे होते व त्यावर कारंज्याचे तुषार उडत असल्या कारणानें विजेच्या दिव्यांची प्रभा त्या तुषारामध्ये मिश्र झाल्या- मुळे इंद्रधनुष्याचा भास होत होता. त्या ठिकाणीं ती उभी राहिलेली पाहून तिच्या समोरच्या बाजूला मीही आशाळभुताप्रमाणे तिजकडे. टक लावून पहात उभा राहिलो. ती तरुणीही मजकडे विशेष टक लावून पहात आहे असा मला दोन तीन वेळां भास झाला. तथापि मजसारख्या क्षुद्र मनुष्याकडे पहाण्याचा तिचा उद्देश नसून तिच्या स्वाभाविक चंचल नेत्रांचा तो दोष असेल असे समजून मी आपल्या मनाची समजूत करीत होतो. तिच्या त्या हृदयभेदक कटाक्षांनी पुन्हा एकवार मजवर आघात केल्यामुळे वेडावून मीं भीत भीतच ती ज्या ठिकाणीं उभी होती तेथें जवळच जाऊन उभं रहाण्याचा उपक्रम केला. त्याबरोबर ती दचकलेल्या हरिणीप्रमाणे उसळून बाणाप्रमाणे तेथून निघाली व आपल्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल ओशाळून मीही तिच्या विरुद्ध मार्गानें बाहेर जाण्यास निघालों. पूर्वी मनांत आल्याप्र- माणे तिच्या स्वाभाविक दृष्टिक्षेपाची निराळीच कल्पना करून विकारव-