पान:मयाची माया.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. हैं ऐकून गांडीवाला वरचेवर माझ्याकडे पहात होता; व शेवटीं तो मला म्हणाला " शेट, असे गाबरतं कसाला ? तुला आमी फसवेल का काय ? " " तसें नाहीं रे, 66 " मी त्याला उत्तर दिलें. भलत्याच, लांबच्या एखाया रस्त्याने गाडी नेलीस तर मला तिथें जायला उशीर लागेल; झणून तुला सांगतों. " मला जेथें जावयाचें होतें तें ठिकाण ह्मणजे मुंबईतील अगदर्दी सुप्र- सिद्ध अशा ठिकाणचें एक असून ते प्रत्येक गाडीवाल्याला अग सहज सांपडण्यासारखें होतें. तरी पण आपण त्या ठिकाणी पोचतों को नाहीं; वाटॅतच आपल्यावर एखादें संकट ओढवतें कीं काय अशी मला भीती वाटत होती ! ५७ इतक्या वेळांत मला जेथें जावयाचें होतें त्याठिकाणीं माझी गाडी जाऊन पोहोचली; व मों अगदी निर्धास्तपणानें, वाटेंत कोणत्याही प्रका- रचा दगा फटका न होतां गाडींतून खाली उतरून गाडीवाल्याचें भाइ चुकते केलें; आणि ज्या गृहस्थाची मला भेट घ्यावयाची होती ते बाहेर गेले आहेत की काय, हे पाहण्यासाठी दहापांच पावले पुढे गेलो. पण तो गृहस्थ बऱ्याच वेळापूर्वी बाहेर गेल्याचं तेथल्या एका नोकरानें सांगित- ल्यामुळे आतां तीन वाजेपर्यंत काय करावें या विचारांत मी तेथेंच आस- पास इकडे तिकडे फिरूं लागलों; व भाड्याची गाडी करून पुन्हा कोठून तरी फिरून यावें अर्से मनांत आणून त्याप्रमाणे जवळच उभ्या असलेल्या गाड्यांपैकी एका गाडीमध्ये जाऊन बसणार तोच माझ्या परिचयाचा गृहस्थ संमोरून येतांना मला दिसला.