पान:मयाची माया.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यसँग ७ वा: याप्रमाणे त्या नोकराच्या मनांत कांहीं तरी शंका येईल असे समजन मीं मोठ्या युक्तीनें त्याचें समाधान केलें; व आज दोन प्रहरों पी जेवा- वयाला येणार नाहीं असें घरांतील मंडळीना कळविण्याविषयीं त्याला सांगून मी आपल्या कामाला निघालों. यावेळी मी जो कांहीं एक विशिष्ट विचार मनांत आणिला होता तो मी घराबाहेर पडतांच थोडावेळ रहित केला आणि नकर्तेच खिशांत ठेविलेलें शिरीनचें पत्र पहिल्यानें वाचून पाहिलें ! मी आज आपल्याला तीन वाजण्याच्या सुमारास अमक्या ठिकाणीं भेटेन असे तिने आपल्या पत्रांत मला लिहिले होलें. तिच्या हातचें तें पत्र वाचन पाहतांच मला जो कांहीं आनंद झाला तो सांगतां येत नाहीं. एकदां तीन केव्हां वाजतात व शिरीन आपल्याला केव्हां भेटते अर्से मला होऊन गेलें. आतां प्रथम मनांत आणिलेल्या विचाराकडे, संकटांतून पार पाडण्याची युक्ती काढ- 'ण्यासाठी मी ज्या गृहस्थाकडे जायला निघालों होतो त्याच्याकडे जाऊ नये असें मला वाटले; पण सुदैवाने ज्या गृहस्थाकडे मी जाणार होतों त्याचें ठिकाण व शिरीननें आपल्या पत्रांत उल्लेखिलेले ठिकाण हीं दोन्हीं एकमेकांपासून लांब नव्हती. त्यामुळे आपण पहिल्यानें त्या गृहस्थाकडेच जावें आणि तीन वाजेपर्यंत त्याच्या येथेंच थांबून नंतर मग शिरीनची वाट पहात ठरलेल्या जागी जाऊन बसावें असा बेत करून मी एका भाड्याच्या गाडींत बसून मला आमक्या ठिकाणी जावयाचें आहे असे गाडीवाल्याला सांगितलं आणि त्याप्रमाणें गाडावाल्याने त्या बाजुला गाडी चालविली. मला मुंबईची काहींच माहिती नव्हती. पण गाडीवाले लबाड असतात हैं मीं ऐकले होते व त्या गोष्टीचा मला गेल्यारात्रीं अनुभवही आला होता; झणून मांडीवाला आपल्याला आता काठे घेऊन जाणार याबद्दल मला खात्री जव्हती. कदाचित् गेल्या रात्रीप्रमाणेच आताही आपण भलत्याच ठिकाणीं जाऊन पडलों तर आपला बेत बाजूला राहन शिवाय शिरीनची व आपली ठरल्याप्रमाणे भेट झाली नाहीं तर काय करावे अशी भीति वाटून मी गाडीवाल्याला " मी ह्मणतों तें ठिकाण तला माहीत आहे ना ? ” असे एखाद्या वेड्याप्रमाणे वारंवार विचारीत होतो.