पान:मयाची माया.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. 46 'साहेब, आपल्याला त्यांची माहिती असेल असे वाटन मीं त्यांची कांही चवकशी केली नाहीं. " 46 ' अरे, मग मी येईपर्यंत त्यांना बसायला तरी सांगायचें होतेंस. 22 असें ह्मणण्यामध्ये माझा हेतु इतकाच होता कीं, जमल्यास त्याच्या- पाशी त्या तिघांजणी आणसी काय बोलल्या है काढून घ्यावें; पण याबर तो ह्मणाला “ थोडा वेळ थांबलात तर बरें होईल असे मी त्यांना सांगून पाहिले; 'पण आझाला दुसरीकडे अगदर्दी निकडीचं काम आहे. येथें थांब- प्याला आझाला मुळीच वेळ नाहीं' असे त्या ह्मणाल्या. ह्मणून तुमचा कोणाला कांहीं निरोप सांगायचा आहे काय असें मी त्यांना विचारलें. " • बग त्या काय ह्मणाल्या ? आश्चर्यचकित् झाल्यासारखं करून मीं त्याला विचारलें. , ' होय साहेब, त्यांनी निरोप तर कांहीं सांगितला नाहीं; पण हे एक पत्र दिले आहे. असे ह्मणून त्यानें एक बंद केलेलें पाकीट माझ्या हातांत दिलें. K ने पत्र हाती घेऊन जसा कांहीं त्याच्याशी आपला संबंधच नाहीं असें मीं आपल्या चर्येनें त्याला भासविलें ! मला पक्के माहीत होते की, हे पत्र शिरीनने आपल्यासाठी ह्मणून दिलेले असून त्यामध्ये माझ्याविष यींचें] तिचें प्रेम वृद्धिंगत होत चालल्याचें कांहींतरी चिन्ह आहे. तिचें माझ्याठिकाणीं जडलेले प्रेम चंचल नाहीं असे मला समज- विण्यासाठीच तिनं हे पत्र लिहिले आहे. यांत शंका नाहीं ! असें मनांत येऊन मीं तं पत्र मोठ्या आतुरतेनें आपल्या खिशांत घातले. व ज्या स्त्रियांचा व माझा कांहीं एक संबंध नाहीं असं मी त्याला भासवीत होता त्या स्त्रियांनी दिलेले पत्र मी आपल्या खिशांत घातलें याबद्दल त्याला आश्चर्य वाटू नये ह्मणून मी कांहीं एका गोष्टीची आठवण झाल्यासारखें करून त्याला ह्मणालों " हं, आतां आलं माझ्या ध्यानांत ! एक पारशी गृहस्थ — आणवी त्याचें नांवही पण पिरोजच आहे - माझ्या ओळ- स्वीचा आहे. तो काल रात्री मी नाटकाहून परत ऑलो तेव्हां माझ्या बरोचर येथेंच येणार होता; आणखी कदाचित् तो गृहस्थ आज येथे असल असे समजून तूं झणतोस त्या बायका त्याच्याकडे झणून आल्या असतील. "