पान:मयाची माया.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ७ वा.. नांव मी विसरलों- 'इथें आले आहेत, आणखीं तुझे हे नंदशंकरशेटजी त्यांचे स्नेही असल्यामुळे मधून मधून ते यांच्या इथे येतात असं आमाला कळलं आहे. पण या नांवाचे कोणीच गृहस्थ मला ठाऊक नाहीत असं सांगतोस; तुला काय ह्मणावं? असे सांगून त्यांनी मलाच उलटा वेडा ठरविलं ! साहेब, ही काय भानगड आहे ती तुमची तुझी आपली समजून घ्या. " नोकराचें बोलणे ऐकून मी मनांत बराच कचरलो. सुरू झालेल्या ह्या घोटाळचानें कांहीं तरी भलत्याच भानगडी उपस्थित न होवोत असे मला " होऊन गेलें. हा इसम ह्मणतो त्या प्रकारच्या तीन बायका. आणखी एक शिपाई हे कोण असावेत याचा मी विचार करूं लागलों आणि ज्याअर्थी त्यांनीं पिरोजच्या नावाचा उल्लेख केला त्याअर्थी त्या आणखी दुसऱ्या कोण असणार ! पण त्यांना माझं हे ठिकाण कसे कळलें ?? त्यांनी नंदूशंकरशेटजींच्या घरी येऊन आपला तपास करूं नये किंवा माझ्याशी यांचा कांहीं संबंध आहे असं येथें कोणाला कळू नये ह्मणून तर मीं काल रात्रीं घरी येतांना त्या माझ्याबरोबर येतात की काय असे वाळून त्यांना मुद्दाम टाळलें होतें; पण शेवटी त्यांना माझा पचा कसा लागला याचं मला मोठें आश्चर्य वाटले नव्हें या गोष्टीची माझ्या मनांत एकप्रकारची भीति उत्पन्न झाली. कारण अशा अशा कोणी तरुण स्त्रिया माझ्याकडे येत असतात असे जर नंदशंकरशे--- टजींच्या कानावर गेलें तर माझ्याबद्दल त्यांना मलताच संशय येईल आणि त्यामुळे पढे मागे माझी कदाचित बेअबूडी होईल अशी माझ्या मनानें धास्ती घेतली. पण आपण यत्किंचितही यालों आहों; किंवा त्या तिघी स्त्रियांचा आपल्याशी कांहीं संबंध आहे असे मी त्या नोकराला कळू दिले नाहीं. आणि त्याने सांगितलेली हकीकत ऐकन मी थोडासा स्तब्ध झालों व आपण जसे कांही त्या गांवचेच नाहीं असें त्याला भास- विण्याच्या हेतूनें किंचित् आश्चर्यचकित झाल्यासारखें दाखवून मीं त्याला प्रश्न केला “ अरे, त्या तिथी बायका कोण, कुठल्या याबद्दल. तूं त्यांना काही विचारले कसें नाहींस. ?! " :