पान:मयाची माया.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. व नुकसान होणार हे आपल्याला अगदी उघड दिसत आहे ती गोष्ट, आपले गुह्य त्याला काय किंवा आणखी कोणाला काय पाहिजे ते झाले तरी कळं न देतां आपला कार्यभाग मोठ्या हुषारीने आणि हिकम- तीनें साधणे हाच खरा शहाणपणा ! शिवाय दुसरं असं की, कोणत्याही गुप्त गोष्टीची वाच्यता झाली झणजे ती साध्य होणे कठीण पडतें. तेव्हां एकंदरीच करायचं की, शेंडी तुटों की पारंची तुटो, ' आपला गुप्त हेतू त्याला समजूं न देतां त्याच्याकडून आपल्याला पाहिजे ती माहिती काढून ध्वायची. बस असेंच ! आतां एक क्षणही जाऊं न देतां एकदम आपल्या उद्योगाला लागावयाचें ! , अशा प्रकारचा दृढ निश्चय करून मी गर्दागर्दीने आपला प्रातर्विधी आटोपला आणि लागलीच आपले कपडे चढवून बाहेर जाण्यासाठी जिना उतरूं लागलों. तोंच आमच्या शेटजींच्या नोकरांपैकी एक इसम जिन्यांतच मला भेटला आणि ह्मणाला “ शेटसाहेब, आपण मघाशी मागल्या दारी गेला होता तेव्हां आपली भेट घेण्यासाठी कोणी एक पारशकि बाई, एक मडम, एक गुजराथी बाई आणखी एक शिपाई इतकी मंडळी गाडींत बसन आली होती. " 66 " काय ? " मी चपापून त्याला प्रश्न केल" "मला भेटायला इतक्यांत कोणी आलें होतें ? ” " होय शेटसाहेब, ती मंडळी आमच्यापैकी कोणाच्याच माहितीची नव्हती. आपल्या शेटजींच्या येथें त्यांच्यापैकी कोणी आलेलं कधीं आतीं पाहिलं नाहीं. आगखी त्यांनी मला सांगितलं की, 'तुझ्या नंदशंकरशेट- जींची व आमची काही ओळख नाहीं. आह्मीं आमच्या पिरोजशेटकडे कांहीं जरूरीच्या कामासाठी आलो आहो. पण साहेब, त्यांचे पिरो जशेट कोण हे काहीं आमच्या लक्षांत येईना. मी तर त्यांच्याकडे वेड्यासारखा पाहूं लागलों; आणखी त्यांना ह्मणालों ' बाईसाहेब, तुझी भलत्याच घरी आला आहां. तुझी ह्मणतां त्या नांवाचे गृहस्थ आमच्या या चंगल्यांत कोणीच नाहींत. पण त्यांना मीं असं सांगितल्यावर त्या पारशी बाई एकदम हंसून मला ह्मणाल्या ' अरे, तूं वेडाविडा तर नाहींसना ! अरे, · कालच आमचे पिरोजशेट कालिजांतून, ' साहेब यांनी सांगितलेलें , 6