पान:मयाची माया.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ प्रसंग ७ वा. न्यावर लोळत पडलों होतों. मनांत आलेली कल्पना कृतीत कशी उतर- वितां येईल याबद्दल साधक बाधक अशा सर्व गोष्टींची आपल्या मनांतल्या मनांत मी शहानिशा चालविली होती. हो पण असं करण्यापासून उपयोग कितपत होईल ? त्याला भेटायचं खरं; पण काल संध्याकाळपासून घडलेली सगळी हकीकत अगदी खडान्खडा तो आपल्याला विचारणार. आणखी आपण मूर्खपणानें, अविचारानें अम- क्या अमक्या गोष्टीच्या नाहीं लागलो आहों असं प्रांजलपणानं त्याच्याशीं कबूल करण्यावांचून कांहीं गत्यंतर नाहीं. बरं इतकंही करून त्यानं भल- तीच सल्ला दिली तर ? आपला हा सगळाच व्यूह ढासळणार ! पण या- पेक्षा त्याच्याकडे जाऊन आतांपर्यंत काय काय घडलं याचा त्याला मुळींच मागमूस लागूं दिला नाहीं. आणखी अमका अमका मनुष्य कोण आहे, तो कु असतो, काय करितों असंच नुसतं त्याला धोरणाधोरणान विचारून आपल्याला पाहिजे आहे तितकी माहिती त्याकडून काढण्याची खटपट केली तर ? छे, तसं करूनही कदाचित् जमणार नाहीं ! कारण, ज्या माणसाचद्दलची माहिती काढावयाची तो माझ्या परिचयाचा नाहीं हे त्याला पक्के ठाऊक आहे; आणखी कांहीं तरी विशेष कारण असल्या- वांचून त्याच्याबद्दलची माहिती इतकी मी खोदून खोदून कां विचारतों असा त्याला सहजच संशय येणार. शिवाय आपण जर त्याचे समाधान करण्याच्या काम आढेवेढे घेतले; उडवाउडवी करूं लागलों तर अशानें आपल्या संकटांतून पार पडण्यासाठी आपण जें त्याचे सहाय्य मिळवूं पाहणार तें मात्र मिळणे कठीण पडेल ! त्याला सर्व हकीकत सांगितली तर कदाचित् त्यांच्या विचाराने आपल्याला कोणताही त्रास न पडतां या पेचांतून मोकळे होतां येईल आणि ज्याच्या ठिकाणी मन इतके आसक्त होऊन मेलें आहे तो आपला हेतूही सिद्धीला जाईल. पण आपण अमुक गोष्ट केली असे त्याला सांगणे ह्मणजे तरी आपल्याला लाजिरवाणेंच नाहीं कां ? आपल्याविषयी त्याची अगदीं जरी अनुकूल भावना असली, संकटांतून आपल्याला तो मुक्त करील अशी आपल्याला त्याच्याबद्दल कितीही खात्री वाटत असली तरी आपल्या हातून जें कृत्य घडलं आहे, जी गुप्त गोष्ट दुसन्थाला – मग तो कोणीही असो- कळविल्यापासून आपली मानलंडना