पान:मयाची माया.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ५१ गृहस्थाच्या घरीं आपण त्याचे पाहुणे या नात्याने उतरलों असतांना जर आपली बदनामी झाली तर त्याचा काय परिणाम होईल ? छे अस- ल्या नुसत्या कल्पनेनें देखील काळींज कसें चर्र होऊन जातें; मग प्रत्यक्ष तसे कांही वडलं तर आपली स्थिति काय होईल ! अशा प्रकारच्या कल्पना मनांत येत असतांना, शिरीनने मला दिलेली तिची दागिन्यांची पेटी - ही मी घरी आल्याबरोबर आपल्या बिछान्या खालीं अगदी आपल्या हाताशींच ठेविली होती माझ्या हाताला लागली व पूर्वीच्या सर्व कल्पना नाहींशा होऊन मी आपल्या कृत्याचें आतां समर्थन अशा रीतीने करूं लागलों की, ज्याअर्थी मायेच्या मोहजालांत अविचारानें जापण स्वतःला गुरफटून घेऊन, शिरीनला वश करण्याचे भयंकर पाडस केलें आहे त्याअर्थी त्या कृत्याचा बरा- वाईट परिणाम भोगण्याला आपण तयार न होणें हा केवढा नामर्दपणा ? इतक्या थराला गोष्ट आल्यावर शिरीन आपल्या हाती येण्याला आतां अगदीच थोडा अवकाश राहिला आहे असे स्पष्ट दिसत असूनही काल्प- निक भीतीने घाबरून आप्तां माघार घ्यावयाची एखाद्या भागुबाईप्रमाणे लपून बसावयाचें, किंवा पळून जावयाचें तरी आपल्या मईपणाला शोभ- ण्यासारखे आहे काय ? छे; ते कांहीं नाहीं. असल्या संकटांतून सुरक्षि तपणानं निभून जाण्याची आणि आपल्या शिरीनला त्या पिरोजच्या हातून सोडवून घेण्याची - खरोखर पाहिले तर कांहीं त्याच्या हातीं अजून लागलेली नाहीं, तरीपण असे आहे तोंच-कांहीं तरी युक्ती लव- कर काढलीच पाहिजे. आतां दुसरा तिसरा विचार करण्यांत फुकट वेळ. घालवीत बसण्याची मुळींच सोय नाहीं. असा आपल्या मनाशीं मीं ताबडतोब निश्चय ठरविला; व लागलीच एक कल्पना माझ्या मनांत येऊन त्याप्रमाणे आपण वागलों, तर खात्रीने या संकटांतून पार पहूं अस मला वाटू लागलें. Co यावेळेला अजमार्से साता वाजून गेले होते. नंदशंकरशेटजींच्या घरा तील सर्व मंडळी निजून उठल्याला बराच वेळ झाला होता.. सर्व माणस आपापले रोजचे व्यवहार करूं लागली होती. शेंटजींचा एक गडी मी उठलों आहे की नाहीं है. पाहण्यासाठी वर आला. मी अजूनही विद्या