पान:मयाची माया.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १ ला. च या स्वर्गीय आणि भूतलगत दीपिकांच्या लखलखाटांत चित्र- विचित्र पोषाखानें अधिकच खुलणाऱ्या अशा मनोहर व तारुण्यानें मुसमुसलेल्या अशा युवतींचा समुदाय - किनरी आवाजानें लटकत मटकत किल्बिल् किल्बिल् गोष्टी करणाऱ्या अशा त्या मिरवत चाललेल्या तरुणी-पाहून ती मयपुरी नसून कामपुरीच वाटत होती. गुलाबी गाल, झुलती चाल, मंदवायाची हालचाल आणि त्यांत युवतींच्या वस्त्रांचे हाल हे पाहून मोहवश होणार नाहीं असा हरीचा लाल त्या समाजांत तरी आढळणे अशक्य ! त्यांतलाच मी एक हें कांहीं निराळें सांगावयास नको. सर्व हिंदुस्थानची शोभा ह्मणजे मुंबई आणि सर्व • मुंबईची शोभा या फेट्मध्ये असा प्रकार त्यावेळी झाला होता. सृष्टीचें बैभव ह्मणजे वसंतऋतूमध्यें नियमित काळपर्यंतच विकवावयाचें. 'परंतु, या मोहमयी सृष्टीचें वैभव ह्मणजे काय त्रिकालाबाधित ! या सृष्टींव काळ आणि वेळ, यम आणि नियम यांचें कोणाला स्मरणही नव्हते. मैत्रिणींच्या स्कंधावर आपले गुलगुलीत हात ठेवून ठिकठिकाणीं घोळ- क्यानें चाललेल्या विलासवती युवतींच्या चरणपावन झालेल्या व आनंदा- अतिशयांत स्वर्गमती झालेल्या पदरजांनी दाही दिशा धुंद करून टाकल्या होत्या. बत्त्यांना आकाशांतील विजेचे दिवे व फेट्मधील चांदण्या यांच्या प्रकाशानें उज्वलता प्राप्त झाल्यामुळे चरणधुलीला व्हायोलेट पावडरची पदवी प्राप्त झाली होती. व शिमग्याच्या धूलिवंदनांत धूलीचा जो गौरव होतो तसाच तिचा या समयींही होत होता. वैभवाचे दिवस हे प्रत्येकाला "केव्हांना केव्हांतरी येतातच असें ह्मणतात में खोटें नाहीं. नाहींतर धूलीच्या स्पर्शानें दूषित मानून वस्त्रें धोब्याच्या अंगावर फेकून देणाऱ्या व तिच्या काळिम्याच्या रागानें गाल गुलाबी नटव्यायुवती आज त्याच धुळीला गुलाल, बुक्याप्रमाणे पवित्र कशा मानत्या व मजसारखे वासना- लोलुप पुरुष या धूलीनें सर्व कपडे भरोब अशी लालसा कसे धरते. या "नयनोत्सवांत मग्न होऊन मी इकडून तिकडे भ्रमण करीत होतो. दुष्का- •ळानें पीडित झालेल्या बुभुक्षिताला ज्याप्रमाणें नुसतें अन्नदर्शनही मोक्षप्रद होतें; त्याप्रमाणेच या नंदनवनतुल्य देखाव्याने माझ्या नेत्रांची स्थिती झाली होती. आशाळभुताप्रमाणें नेत्रांचें पारणे फेडण्याकरितां पुन्हा