पान:मयाची माया.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ प्रसंग ६ वा. नाहीं. तरी पण माझें मन अजून देखील स्वस्थ झाले नव्हतें. यदाकदाचित् कंकणे जरी चोरांच्या हाती लागली असली तरी तीं आतां पुन्हां शिरी- -नलाच मिळालेली आहेत; तेव्हां त्या बाबतीत मला काळजी वाटण्याचे कारण नव्हतें. पण त्या पारशी तरुणाबद्दलची भीती, व बंदरावरून निघून पुन्हां गाडीत बसेपर्यंत दृष्टीस पडलेले विचित्र प्रसंग, त्या दोघी स्त्रियांचा व पिराजीचा चोरांनी केलेला छळ, व विशेष करून पिरोजचेंचरचेवर भीतिप्रद होणारे अर्से आगमन, त्या तरुणींचें हंसर्णे, व माझी त्यांच्या समक्ष एकदां दोनदां झालेली फजीती-माझी फ्रजीती झाली, पिरोजला पाहून मी अगदीं घाबरून गेलो होतो असे त्यांच्या निदर्शनाला आल्यावरूनच त्या ति स्त्रिया वस्त्वेवर हंसत होत्या असे मला वाटत होते-वगैरे गोष्टींचा माझ्या मनावर कांहींसा परिणाम झाला होता; व त्यांतल्यात्यांन पिरो- जच्या शिरीनचा आपण अभिलाष धरून है कर्म करीत आहों हे चांगलें नव्हे असे मला मधून वाटे; पण शिरीनच्या प्रेमानें वेडावून गेलेले माझें मन या काम पाहिजे तो त्रास सोसण्याला तयार झाले होते. त्यामुळे तें बिलकुल माघार घेईना; असो. असे विचार माझ्या मनांत चालले असतांना पुन्हां पहिल्याप्रमाणे “ चोर चोर " अशी आरोळी ऐकूं आली; झणून आपली गाडी जरा ● थांबविण्याला मी गाडीवाल्याला सांगितलें; कारण माझ्या प्रिय शिरी- “नची गाडी मागून येत होती; व त्या तिन्हीं तरुणींच्या सुरक्षितपणाची • जबाबदारी, निदान शिरीनपुरती तरी मी आपल्यावर घेतली होती. तेव्हां हा काय घोटाळा झाला आहे हे पाहणे माझें काम होतें; आणि आझी गाड्यांत बसून निघाल्यापासून ज्याअर्थी पिरोज कोठें मंदिसला नाहीं त्याअर्थी त्याचें आतां आपल्याला भय नाहीं असें मी समजत होतों. गाडीवाल्याने आमची गाडी लागलीच उभी केली; व मी खालीं उत- रून मागची गाडी अजून कां येत नाहीं ह्मणून रस्त्यांत उभा राहिलों. तों गाडीच्या दोन्ही बाजूला दोन तरुण धांवत आहेत असे मला दिसलें. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी त्या गाडीपाशी गेलों; पण मला पाहतांच ते दोन्ही तरुपा रस्त्याच्या दोन बाजूला पळून गेले. गाडीजवळ