पान:मयाची माया.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ५ वा.

हे झणजे मी कांही मोठेंसें काम केलें असें नाहीं. तरी पण आतां येथें थांबणे चांगलें नाहीं. " '

ल्यूसी माझ्याकडे पहात पहात हंसून ह्मणाली ' गाड्या आणायला

पिराजी गेला आहे; तो आतां इतक्यांत येईल. पण शिरीनवाई मी आतां घरी एकटीं कांहीं जायची नाहीं. १ ' हे पहा, ● शिरीन तिला सांगू लागली, ' आपण तिघी एका गाडींत बसूं. वाटेने माणेकला पोंचती करूं. आतां रात्र कांहीं फारशी उरली नाहीं.. आणखी मग माझ्या घरापर्यंत तूं मला पोंचीव, अन मग हूं आपल्या घरी जा. आतां तुझी आई कांहीं तुला राग भरणार नाहीं. पिरोज व पिराजी एका गाडीत बसतील; आणखी दोन्ही गाड्या वेगळे रस्ते फुटेपर्यंत बरोबरच जातील ह्मणजे झालं. पिरोज चें घर वाटेवर असले तर आपण त्यांना पोचवूं, आणखी पिराजीला घेऊन पढें जाऊं. १ 66 "

“ हो गडे, मी तसंच ह्मणणार होतें.

पहिल्यानें मला आपल्या घरी पोंचती करा, ” याप्रमाणे सांगून माणेक दाराशीं गेली व लागलीच परल येऊन ह्मणाली ह्या पहा पिराजीनें गाड्या आणल्या आहेत. चला तर आतां लवकर. " 66 माणेक ह्मणाली " पण हो पण, " शिरीन ह्मणाली " निघण्याच्यापूर्वी एकदां सर्वांन शराब घेतलीच पाहिजे. ह्मणजे आज झालेला सर्व त्रास नाहींसा होईल. "

इतके सांगून तिनें पेटींतून मदिरेची बाटली, ग्लास वगैरे सामान

काढलं; आणि आह्मीं सर्वांनी यथास्थितपणे मद्य प्राशन केलें. आह्मीं आतां गाडीत बसण्यासाठी घराबाहेर पडणार तोंच समोरच्या खोलींतून पिरोज डोकावत आहे असे माझ्या दृष्टीस पडलें ! पण थोडक्यांतच तो दिसेनासा झाला. तरी मी आपली नजर त्या खोलीच्या दारा- कडे लाविली होती; व आतां पिरोज बाहेर आलां कॉ, त्याच्यावर हल्ला केल्याशिवाय सोडायचें नाहीं असा निश्चय करून त्या तरुणीकडे लक्षं न देतां मी मोठ्या तयारीनें उभा राहिलों. हॅ पाहून त्या तिघी स्त्रिया पुन्हां एकसाख्या हंसूं लागल्या. पण इतक्यांत शिरीनची पेटी हातांत घेऊन सोलीच्या दारांतून पिराजी आमच्याकडे धांवत आला, न घाबऱ्या घाबन्या