पान:मयाची माया.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

तिच्या हातांत कांहींतगरी चकचकत होतें अर्से मला दिसले. ती आमच्या- जवळ येऊन आश्चर्ययुक्त मुद्रेनें म्हणाली ' हा कोण तरी बाई चमत्कार ! पिरोज आपल्याला चोरांच्या तावडीतून सोडवायला आला; पण चोरांनी पळून जातां जातां पिरोजला बरेंच मारलें; आणखी तो तिथेच विवळत पडला होता. त्याच्या एका पायाला बरीच दुखापत झाली; आणि त्याला जागेवरून उठायला देखील येत नव्हतें; पण इकडे पाहवं तो पिरोज आपल्या प्यारीच्याजवळ उभा ! पाहिलंसका ल्यूसी, शिरीनवर पिरोजचें कसें प्रेम आहे तें ! "

अग बाई पण से काय आहे तुझ्या हातांत ?” शिरीननें तिला

विचारलें. 66 अग हीं तुझीं हियांचीं कंकर्णे" माणेकनें उत्तर दिले. " अग चोर हीं कंकर्णे घेऊन पळून जात होते; पण इतक्यांत पिरोजनें त्यांच्याशी झटापट करून ती हिसकावून घेतलीं; पण त्याला चोरांनीं मारलें तेव्हां त्याच्या हातांतून र्ती पडली असावीं. मी मघाशीं तिकडे गेले तेव्हां तीं कोपऱ्यांत पडलेली मला दिसली. " 66 “पिराजीला देखील मेल्यांनी फार मारलें हो!" ल्यूसी मध्येच ह्मणाली. त्याला बिचाव्याला बांधलें होतें; ह्मणून त्याचा कांहीं उपाय चालेना. पण शेवटीं पिरोज शेटनीं त्याला सोडबिलं ह्मणून बरं झालं. खरोखर पिरोजशेट, ” ल्यूसी माझ्याकडे पाहून ह्मणाली, " तुमचे आह्मां सर्वांवर फार उपकार झाले आहेत. १७

आपण पिरोज आहों असेंच या तिघींना अजून वाटत आहे ही गोष्ट

तर आपल्या पथ्यावरच पडली असून, खन्या पिरोजला चोरांनी बेदम मारिलें, त्याचा एक पाय लंगडा झाला है तर आपण मघाशींच पाहिलें. आतां तो येथून जो पळून गेला तो कांहीं बर। झाल्यावांचून शिरीनकडे खास येत नाहीं असें मी समजलों; व या गोष्टीचें मला मोठे समाधान वाटले आणि त्या तिघींची समजूत तशीच कायम ठेवण्याचा आपण यत्न केला झणजे आपला कार्यभाग. झाला असे माझ्या मूर्ख मनाने ठरवून मी त्या तिघींना उद्देशून ह्मणालों " तुझाला चोरांच्या हातून सोडविल्या 66