पान:मयाची माया.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ५ वा.

काय चमत्कार असेल तो असो; षण लागलीच त्या खोलींतून एक पारसी तरुण-अर्थात फिरोज व ल्यूसी बाहेर येत आहेत असे माझ्या दृष्टीस. पडलें ! माणेक व तो पारशी तरुण आह्मीं दोघे उभे होतों तिकडे येत. होते; पण पिरोज माझ्याजवळ न येतां लंगडत लंगडत डाव्या अंगाला येऊन माझ्यापासून सरासरी पांच सहा हाताच्या अंतरावर उभा राहिला... ल्यूसी मात्र आमच्या अगदी जवळ आली; व तिनें पिरोजला काही तरी खूण केली. ती पाहतांच तो चट्कन् दाराबाहेर निघून गेला. पिरोज माझ्याकडे येत आहे असे पाहतांच मी खाली पाहू लागलों. माझ्या मनांत उत्पन्न झालेला आनंद आतां जागच्याजागीं जिरून गेला; व पुन्हां भीतीने माझे शरीर कांप लागले. हे पाहून त्या दोघीं स्त्रिया ह लागल्या; आणि मला या गोष्टीची इतकी शरम वाटली कीं, कांहीं सांगतां येत नाहीं; पण पिरोज तेथें उभा होता. तोपर्यंत तोंडांतून एक ब्र देखील. काढण्याचें मला धैर्य होईना. मार खाण्याची, विडंबना करून घेण्याची, फार तर काय जीव जाण्याची आतांच वेळ आली आहे हे मला तेव्हांच कळन. चुकलें व आपल्या शत्रूच्या अंगावर आपणच तुटून पडावें असा विचार करून पिरोज दाराबाहेर जात होता त्याच्या मागोमाग जाऊन जोरानें त्याच्यावर हल्ला करण्यासाठी मी निघणार तोच शिरीनने मला घट्ट धरून ढेविलें. आणि त्या दोघीं पुन्हां मोठमोठ्यानें हसूं लागल्या ! हे पाहून मला त्यांचे फार आश्चर्य वाटले. कारण, ल्यूसीला नुकतेंच चोरांनी गांठन त्रास दिला होता. तरी त्याबद्दल एक चकार शब्दही न काढता ती आपली माझ्याकडे पाहून एकसारखी हंसत आहे. हा केवढा चमत्कार ! अ मला वाटले. थोड्या वेळांपूर्वी त्या दोघींनाही वाटत असलेली चोरांची येवढी भीती येवढ्यांत कशी नाहींशी झाली हे मला समजेना ! माझ्याकडे. पाहून हंसण्याचा तर त्यांनी एकसारखा सपाटाच लाविला होना ! मला, कांही वेळ त्यांच्या या विलक्षण कृतीचें आश्चर्य वाटलें खरें; पण आप- पाच त्यांच्या हास्याचा विषय आहो असे ध्यानांत येतांच मला त्यांचा राग आला. त्यांच्या दोघींच्या त्या विलक्षण हंसण्याबद्दल मी त्यांना कांहीं बोल-- प्यार तोच मागेकडी हंसतच पलीकडच्या खोलीतून बाहेर आली. यावेळी