पान:मयाची माया.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

लाज होऊन आईबापांचें ह्मण मला कबूल करावे लागेल. आणखी तुझ्या ठिकाणी जडलेल्या माझ्या प्रेमाबद्दल निराश होऊन आईबाप ठर- वितील त्या श्रीमंताच्या मुलाशीं मला लग्न करणे भाग पडेल. ह्मणून ह्मणतें कीं, असं बचन द्यावंसं जर तुला वाटत असेल आणखी ते पाहिजे त्यावेळीं-कारण पडलं तर उद्यां देखील-खरं करून दाखविण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे असं तुला वाटत असेल तर त्याप्रमाणं मला आतांच काय तें सांग. पिरोज, माझ्या प्रेमाची अजून तुला खरी कल्पना आली नाहीं. " 16

है तिचें आशाजनक भाषण ऐकतांच माझ्या मनाला कांहीं विलक्षण

उत्साह वाटू लागला; व लागलीच तिच्या हातावर मी आपला हात मारून तिला ह्मणालों ' अंः इतकंच ना ! तर मग हे घे माझं वचन ! त्यांत गं काय आहे ! प्यारी शिरीन, तुझ्यासाठी मी पाहिजे तेव्हां आपला प्राण देखील देईन; यापेक्षा आणखी काय सांगू ? याप्रमाणे आमच्या दोघांच्या हितगुजाच्या गोष्टी सुरू होण्यापूर्वी आमच्याजवळ येऊन उभी राहिलेली माणेक मध्येच पिराजी व ल्यूसी ज्या बाजूला होती त्या बाजूला गेली; व शिरीनशी हव्या त्या रीतीनें बोलण्याला मला कोणाचीच आडकाठीच नव्हती; ह्मणून तिच्याशी मी अगदर्दी मोकळ्या मनानें बोलत होतों; आणि तिच्या ह्मणण्याप्रमाणे वाग- ण्याचें मी तिला वचनही दिले. आतां चोरांची भीती नाहींशी झाली होती; व कांहीं वेळापूर्वी ल्यूसी व पिराजी पिरोजशी बोलत असल्याचा मला भास होत होता; पण त्यानंतर ल्यूसी आणि पिराजी या दोघांमध्ये चाललेल्या बोलण्यावरून पिरोज तेथून गेला असावा असे मला वाटल्या- मुळे आणि शिरीननं आपलें प्रेम मला अर्पण केल्याचें तिच्या तोंडन एक- ल्यामुळे आतां माझा आनंद गगनांत मावेनासा झाला ! आतां तेथें राहणे चांगले नाही असे वादन मी शिरीनला ह्मणाली शिरीन, आतां आपण लवकर अपापल्या घरी जावें हे चांगलें. "

हो, मी तरी तेंच ह्मणतें.” याप्रमाणे माझ्या सूचनेला अनुमोदन

देऊन शिरीननें पिराजीला हांक मारिली. पण " पिराजी गाड्या आणा- यला गेला आहे " असें ल्यूसीनें पलीकडच्या खोलींतून उत्तर दिले आणि