पान:मयाची माया.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. प्रसंग १ ला. ०५०५० मयासुराची माया ! मुंबईची फॅन्सी फेट् ज्यांनी पाहिली असेल त्यांना पुराणांतरीं वर्णन केलेल्या मयासुराच्या मायेची कांहींच माया वाट- णार नाहीं. या महामायेच्या फेन्यांत मी कसा गुरफटला गेलों व त्याच्यांत आमची काय काय त्रेधा उडाली याचीच हकीकत मी या गोष्टीच्या द्वारें वाचकांस देणार आहे. सुमारें १९०३ सालची गोष्ट. मी खेडेगांवचा मनुष्य. गुजराथेंतला राह. णारा. जातीनेही गुजराथीच. तेव्हां सर्व जगाच्या मायेपेक्षां पैशाची माया जास्त बाळगणारा. असे असूनही ही फॅन्सी फेट् पाहून आलेल्या लोकांची वर्णन वाचून माझ्या मनांत ती पहाण्याची अनावर इच्छा उत्पन्न झाली व ती पाहण्याकरितां मी मुंबईस येऊन दाखल झालों. एकवार पाहून माझ्या मनाला जो मोह उत्पन्न झाला तो केवळ अनावर होता. मी लागलींच सीझन् टिकीट काढलें. व डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत ती पहात रहाण्याचा निश्चय केला. रोज सकाळसंध्याकाळ जेवणावांचून सर्व वेळ मी तेथें घालवीत असे. बोलून चालून गांवढळ; परंतु शहरांत आल्यावर अनि- वार मोहाला बळी पडून नित्यशः भपकेदार पोषाख करून एखाद्या नवर- देवाप्रमाणें नटण्याची व मिरवण्याची माझी नित्य कवाईत चालत असे. एके दिवशीं संध्याकाळची वेळ होती. ना० गव्हरनर साहेबांची स्वारी फेट् पहावयास यावयाची होती. त्यामुळे रोजच्यापेक्षा जास्तच गर्दी जमली होती. आकाशांत चांदणे निरभ्र पडले होते. जानेवारीचा महिना ह्मणजे मुंबईच्या गुलाबी थंडीचे दिवस समुद्रकिनाऱ्याचा गार वारा; त्यांतूनही पारशी युवतींच्या कपड्यांच्या सुवासांनी तो दुमदुमून गेलेला. पारिजाताच्या फुलाप्रमाणे उधळलेल्या आकाशांतील चांदण्या आणि फेट्मध्ये चांदण्याप्रमाणेच चमकणारे विजेचे दिवे