पान:मयाची माया.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ५ वा. 1

तरी भीतीमुळेच; पण ती भीती चोरांची मात्र नव्हे. चोरांच्या भीतीनें भेदरून जाणारा मी नव्हें. माझ्या अंगांत पाहिजे तेवढी शक्ती आहे. आणखी दोनचारच काय पण दहा पांच चोरांनीं जरी माझ्यावर एकदम हल्ला केला तरी त्या सर्वांचा मी खरपूस समाचार घेईन. शिरीन, इतके सगळे जरी खरें आहे तरी पण एका गोष्टीची मात्र मला अतीशय भीती वाटत आहे. शिरीन, तुझें प्रेम माझ्याठिकाणीं नेहमीं टिकेल की नाहीं या एका कल्पनेच्या अनिश्चितपणापुढे माझी सर्व शक्ती, माझें धैर्य, अवसान गळून गेल्यासारखें झालें आहे. कोणत्याही कारणामुळे तूं जर कदाचित् पुढें मार्गे माझा आव्हेर केलास तर मात्र मला मरणप्राय दुःख होईल; आणि या काल्पनिक दुःखाच्या भीतीनें यावेळीं मीं अगदीं गांगरून गेलो आहे. 35

" पिरोज, " पुन्हां लडिवाळपणानें मला मिठी मारून माझें अंतःकरण

विव्हल करणाऱ्या त्या तिच्या प्रेमदृष्टीने माझ्याकडे पहात पहात आपलें सुकुमार मुख माझ्या कानाजवळ करून अगदी हलक्या आवाजानें शिरीन ह्मणाली " पिरोज, माझ्या प्रेमाबद्दल आतां तुला मुळींच भीति वाटायला नको; पण आईबापांच्या रागावण्याने किंवा आणखी एखाया कारणानें आजउद्यां जर माझ्यावर एखादं संकट आलं तर तूं मला विसरणार नाहींस असे तुझ्याकडून मला एकदां वचन मिळाले ह्मणजे तुझ्यासाठीं मी पाहिजे ते साहस करीन. असे झाले ह्मणजे मग पिरोज, माझ्या प्रेमाबद्दलची तुला कोणत्याही प्रकारची शंका, भीती, मनांत आणण्याचें कारणच उरणार नाहीं. पिरोज, मी एखाद्या वेळी अशा प्रसंगात सांप- डले, आणखी तूं जर मला सोडलेंस, मला सहाय्य केलं नाहींस, तर जें कांही होणार असेल निमूटपणानें मला सहन नाहींकां करावं लाग- णार ? तुझा आधार असल्यावर मग मला कोणाचीच पर्वा नाहीं ह्मणा ! हूं गरीब आहेस या कारणामुळे तुझा व माझा प्रेमसंबंध घडूं नये असं वाटून माझ्या आईबापांनी कितीही हरकती घेतल्या, माझ्या वाटेंत कितीह अडचणी उत्पन्न केल्या तरी- इतकंच काय पण त्यांनी मला जरा घरांतून हांकून दिलं तरी मला त्याबद्दल मुळींच दुःख वाटणार नाहीं. पण एनप्रसंगी तूंच जर कां मला फसविलेंस तर मात्र माझा नाइ-