पान:मयाची माया.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

मला वाटत असलेली भीती मुळींच कमी झाली नव्हती. पिरोज हाचर त्यावेळी माझा खरा शत्रू होता; व त्याच्या प्रिय शिरीनला फसवून वश करण्याच्या माझ्या अपराधाबद्दल तो चारचौघांत माझी छीथू करील, व मला हवा तितका मार देईल, नव्हें; कदाचित् मला ठार मारायलाही कमी करणार नाहीं. येवढीच वास्तविक मला कायती भीती वाटत होती. इतक्यांत “पिरोज, तुझी वेळेवर आला नसता तर चोरांनी आह्मां सर्वांन आज मारूनही टाकले असते असे शब्द एकाएकी कानी पडल्याचा मला भास झाला ! मग काय विचारावें ! माझ्या भीतींचा तर आतां कडे-- लोट होऊन गेला. चोरांचे संकट, त्यांचा मारही मी खुषीनें पत्करला असता; पण इतका वेळ नाहींसा झालेला पिरोजरूपी कृतांत: मध्येंच आला आहे असे समजतांच माझ्या डोळ्यापुढे एकदम अंधेरी आली; व मी. बशुद्ध होऊन जमीनीवर पडणार होतों; पण शिरीन में लागलीच मला सांकरलें. , [१५]

ही सर्व स्थिती माझ्या लक्षात आली. ज्या कोमलांगीला वश कर

ण्याच्या नाहीं लागुन मी त्यावेळी घेतलेल्या सोंगाची बतावणी करीत. असताना आपल्या अंगीं मोठं धैर्य व धाडस आहे असे भासवीत होतो. तिला आपण नामई, भ्याड आहों असे समजलें ही गोष्ट माझ्या ध्यानात येतांच माझ्या आशेचे शतशः तुकडे होऊन गेले. भीतीने आणि निराशन आपला पूर्ण अंमल माझ्यावर बसविला. माझ्या सर्वांगाला पुन्हां दरदरून घाम फुटला; व माझी चर्या अगदींच निस्तेज दिसूं लामठी; कारण शिरीन लागलीच आश्चर्ययुक्त मुद्रेनें माझ्याकडे पहात ह्मणाली 'अगबाई ! पिरोज, तुला ही इतकी भीती कसली वाटते आहे ! आणखी तुझा चेहेरा असा एकदम पांढरा फटफटीत, कां बरं दिसूं लागला ?: पिरोज, है एकाएकी असे कशानें झालें मला सांगशील कां ?" तिला पूर्णपणे कळून चुकलेली गोष्ट नाकबूल करणे आतां अगदी अशक्य होऊन गेलें; तरी आपण चोरांना मुळींच भ्याकों नाहीं; आणि आपल्या. मध्ये पाहिजे तितकें अवसान आहे. असे भासविण्याच्या उद्देशानें मीं उत्तर दिले " होय, शिरीन, मला फार भीति वाटते. आहे.. भीतीने मी अगदी गांगरून गेलो. आहे. माझ्या अंगाला हा जो घाम फुटला आहे तो