पान:मयाची माया.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४.

प्रसंग ५ वा.

व्व माणेक रडत ओरडत इकडून तिकडे धांवत होती. त्यांच्या सर्वांच्या भयंकर किंकाळ्या मधून मधून कानावर पडत असल्यामुळे माझी तर अगदी त्रेधा उडून गेली होती ! आतां भयभीत झालेल्या माझ्या भित्र्या • मनाला धीर देणे आणि लट्लट् कांपणाऱ्या ब घामानें भिजून गेलेल्या +माझ्या शरीरामध्ये अवसान आणणे अगदीच अशक्य झाले होतें; तरी आपण भ्यालों नाहीं असें शिरीनला भासविण्याचा यत्न करणे मला फार अवश्य वाटत होतें ! आपण भित्रे आहों; चोरांच्या भयाने यावेळी आपण अगदी गर्भगळीत होऊन गेलों आहों अर्से शिरीनला कळणें झणजे आपला 'आपण होऊन आपमान करून घेणे होय. तेव्हां पाहिजे तें झालें तरी तिला ही गोष्ट कळं द्यायची नाहीं; व आपल्याला थंडीने अतीशय हुड- हुडी भरली असल्यामुळेच आपली अशी स्थिती झाली असें जें तिला वाटत आहे हे एकाअर्थी बरेंच आहे. या तिच्या अज्ञानाचा उपयोग करून आपण यावेळी आपली बाजू संभाळली पाहिजे. असा विचार करून मी ह्मणालों ' खरेंच शिरीन, बंदगवरून आपण इकडे यायला अनिघालों तेव्हांपासून मला अशी कांहीं विलक्षण थंडी वाजत आहे; आणखी त्यामुळेच माझे हातपाय कांपत आहेत ! ? ' हे माझ्या लक्षांत आले ह्मणून तर बंदरावर आपण येतांच मी तुला पुन्हां शराब दिली. इतकें बोलून शिरीन माझ्याकडे पाहू लागली. यानें मी कसा गांगरून गेला आहे हे तिच्या लक्षांत आले असावें; पण ही गोष्ट बोलन दाखवावी कीं नाहीं असा तिच्या मनांत विचार चालला होता; याबद्दल मला शंका उरली नाही. कारण यावेळी तिच्या चंचलने- -बांत एकप्रकारची चमत्कारिक चमक मारीत होती व त्यावरून तिच्या • मनांतील हेतू ती लबाडीनें मला कळं देत नाहीं असा मला संशय आला. यावेळी माणेक आमच्याजवळ येऊन उभी राहिली; व तीही बरीच निर्भय झाली असावीसें दिसत होते. पलीकडच्या जागेतून इतका वेळ ऐकूं येत असलेल्या किंकाळ्याही आतां बंद पडल्या होत्या; व त्यावरून चोर 'पळाले असावे, किंवा सर्वांच्या संरक्षणासाठी कोणी माणसें आली असावीं असे मला वाटलें. पण इतकें झालें तरी माझी भीती कांहीं गेली नाही. कारण चोर पळत गेले असले तरी पिरोजबद्दलची