पान:मयाची माया.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

• ३३ कफल्लकाच्या वाटेलाही गेले नसते. पण सर्व त्रैलोक्यांतील सौंदर्य एकवटून आपल्या कौशल्याच्या परमावधीने बनविलेल्या त्या लावण्य पूर्ण शिरीनच्या प्रेमामुळेच मला चोरांची भीती वाटत होती; व त्याहीपेक्षां अधिक असें पिरोजचं जें मला भय वाटत होते त्याचें तरी कारण काय ? तिनें दिलेल्या त्या दागिन्यांच्या पेटीवर तरी तिच्या प्रेमामुळेच ममत्व उत्पन्न झाले होतें ! तिच्या प्रेमाच्या अभावीं मी त्या पेटींतील दागिन्या- वर कधींही भाळलों नसतों ! पण ते तिचें प्रेम ! तिला फसवून वश कर- ण्याची व तिनें प्रथम पसंत केलेल्या त्या पिरोजला सोडून देणें भाग आहे असें ती आपल्या पूर्णपणे हातांत आल्यावर तिच्या निदर्शनाला आणून देण्याची माझ्या मनांत उत्पन्न झालेली दुष्ट वासना जर मी पहि- ल्यानेंच जागच्याजागीं दाबून टाकली असती तर मला कशाचें भय होतें ? पण तसे कोठून होणार !

प्रसंग ५ वा.

38800 शिरीनची भीती आतां बरीच नाहींशी झाली अर्से तिच्या चर्येवरून मला वाटू लागलें. ती आतां माझ्याकडे एकप्रकारच्या वेगळ्या नजरेनें पहात होती; व त्यावरून माझ्या भितरेपणाबद्दल तिला माझा तिरस्कार वाटत असावा असे दिसलें; पण माझें सर्वांग भयानें लट्लट् कांपत होतें. तरी ही कल्पना तिनें शब्दांनी मला व्यक्त मात्र करून दाखविली नाहीं. मी तिच्याकडे पहात आहे अर्से तिच्या लक्षांत येतांच तिची चर्या बदलली. माझ्या स्थितीबद्दल तिला आश्चर्य वाटत आहे असें भासविण्याच्या हेतूनें ती ह्मणाली " पिरोज, अजून देखील तुझी थंडी कशी जात नाहीं याचा मला चमत्कार वाटतो. थंडीनें तुझें शरीर अजून कांपत आहे. " ५ यावेळी तिनें आपल्या कोमल हातानें माझा उजवा हात घरिला. माझे हातपाय अद्यापही कांपतच होते; व त्यांतल्या त्यांत पलीकडच्या बाजूला चोरांच्या छळण्यानें व मारानें ल्यूसी व पिगजी विव्हळ होऊन गेले होते,