पान:मयाची माया.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ४ था.

सारखी इकडून तिकडे रडत ओरडत सुटली होती. त्यावेळी स्वसंरक्षणाचा भार आपल्या प्रियकरावर टाकण्यासाठीं शिरीन कांहीं वेळ इकडे तिकडे पहात होती; पण विरोज कोठेंच दिसत नाहीं असे लक्षांत येतांच तिनें आपल्यापेक्षा किती तरी पटीने अधिक भ्याड बनून गेलेल्या अशा एका माणसाचा अथात् माझा आश्रय केला !

असा प्रसंग माझ्यावर पूर्वी कधींही आला नव्हता. त्यामळे भीतीनें माझे

हात पाय लट्लट कांपत होते. तरी काय होईल तें होवों पण निदान अशा आणिबाणीच्या प्रसंगी भलतेंच कांहीं घडलें तर सर्वांचें प्रत्यक्ष प्राणही जायचे अशा या घोर प्रसंगी आपण भितरे आहों अर्से तिला कळं द्यायचं नाहीं असा मनाचा पक्का निर्धार करून मी मोठ्या धैर्यानें शिरी नला आपल्या एका हातानें घड्ढ धरून ठेविली; व धीर देऊन तिला ह्मणालों " शिरीन, तुझें रक्षण करण्याच्या कामीं मी आपला प्राणही देण्याला तयार असतांना तुला इतकें घाबरण्याचें मुळींच कारण नाहीं. येथें तुला एकटीला सोडून जाण्याचें माझ्या अगदीं जिवावर आले आहे. तसे नसते तर चोरांची काय विशाद आहे; मी एकटा जाऊन त्यांचा समाचार घेईन; व तुझ्या प्रिय ल्यूसीला आणि पिराजीला तेव्हांच सोडवून आणीन ! पण काय करूं ! अशा या भयंकर स्थितीत काय करावें है मला सुचत नाहीं ! यावेळीं तुझी माणेक- बाई जरी क्षगभर तुझ्या जवळ येऊन उभी राहिली तरी सुद्धां चोरांची खोड मोडण्यासाठी तिकडे जायला मला थोडेंसें अवसान येईल ! " ३२

असे बोलत असतांना माझा आवाज बराच कांपत होता. कारण निर्भयप

णाचें त्यावेळी मी केवढे जरी सोंग आणलें असलें, चोरांचा समाचार घेण्याचें आपल्यामध्ये पाहिजे तेवढे अवसान आहे अर्से पाहिजे तितक्या युक्तिप्र युक्तीनें तिला भासविले असले तरी माझ्या अंतःकरणाला थरथर कांप- वून सोडणारी भीती कांहीं अद्याप माझ्यामधून नाहींशी झाली नव्हती. वास्तविक पाहिले तर मला स्वतःला चोरांची भीती वाटण्याचं कांहीं कारण नव्हतें. मीं आपली अत्यंत मौल्यवान् अंगठी शिरीनला केव्हांच देऊन टाकली होती; व माझ्याजवळ स्वत:चें असें त्यावेळीं कांहींच राहिलं नव्हतें; आणि खरें पाहिले तर चोर माझ्यासारख्या