पान:मयाची माया.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मयाची माया.

पाहून शिरीन अतोनात घाबरून गेली. तिची ती रमणीय चर्या आतां एका- एकीं विलक्षण निस्तेज दिसूं लागली. हा एकंदर घडून आलेला आक स्मिक प्रकार पाहून भीतीने माझ्या उरांत धडकी बसल्यासारखे होऊन हातपाय थरथर कांपूं लागले. कोण है भयंकर संकट ! आपली प्रिय शिरीन व आपण आपल्या बरोबर असलेल्या मौल्यवान् जिनसांसुद्धां निभावतों कसे ? आपल्या मदतीला जरी कदाचित् आसपासचे लोक

ले तरी आपण शिरीनला फसवून बंदरावर नेल्यामुळेच हे संकट ओढ-

वलें असे त्यांच्या उघडकीला येऊन आपली छी थू होणार ! नुकत्याच दृष्टीस पडलेल्या शिरीनच्या प्रियकर पिरोजला- तो जवळच कोठें असला तर ही बातमी समजल्यावांचून राहणार नाहीं. आणि असें झालें ह्मणजे तो इकडे शिरीनचें रक्षण करण्यासाठीं एकदम घांवून आला तर आपण काय करावें ? कारण येथें पुन्हां त्यानें मला शिरीनजवळ पाहिले म्हणजे मात्र तो आपल्यावर दया करणार नाहीं ! बरें आपली पेटी घेऊन आपण येथून पळ काढला तर ? छे, हे भानगडीचे रस्ते ! या बाजूला नेहमीं येणारीजाणारी मंडळी सुद्धां आज अगदीं चुकून गेली; मग आपल्यासारख्या नवख्या माणसाला रस्ता कशाचा सांपडतों. बरें इतकेंही करून धैर्यानें तसेंच येथून जावें तर ही असली अपरात्रीची वेळ. वाटेनें जिकडे तिकडे शुकशुकाट झालेला ! वाट विचारायला सुद्धां कोणी माणूस भेटणार नाहीं. शिवाय चोर आपला पाठलाग करीत आले तर ? आपल्याजवळ असलेली शिरीनची दागिन्यांची पेटी जाऊ- नच्या जाऊन फुकट मार मात्र खावा लागणार ! बरें इतकेंही जरी पत्क- रलें तरी पण इकडे प्रिय शिरीनची काय वाट होणार ! अशा भीतिप्रद अनेक कल्पना एकाएकी माझ्या त येऊन एकदम सर्वांगाला दरदरून घाम फुटला; व डोळ्यापुढे अंधेरी आली ! अशा स्थितींत मी घाडकन् जमिनीवर पडून बेशुद्ध झालो असतों; पण शिरीननें माझ्या गळ्याला मिठी मारली; व तिच्या संरक्षणासाठी माझ्या मदतीची अत्यंत अपेक्षा आहे असे मला तिनं भासविले; कारण त्यावेळी तिचा प्रिय पिरोज तेथं • पिराजी चोरांच्या तावडीत सांपडलेला होता. ल्यूसीलाही त्यांनीं धरून ठेवलें होतें, व माणेक तर संरक्षणासाठी गयावया करीत वेड्या- नव्हता.