पान:मयाची माया.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ४ था.

आवाजानें तिनें पिराजीला विचारलें " अरे, मग तूं माणेकचाईच्या बापाचें नांव कां त्याला सांगितलें नाहींस. तिच्या बापाचें नांव या बाजूला सर्वांना माहीत आहे. १" 66

'

बाईसाहेब, ते सांगितले म्हणून तर मला परत येतां आलें; नाहीं-

तर त्या गृहस्थानें मला चोर समजून पोलीसच्या हवाली केलें असतें ! पण माणेकबाईंच्या बडलांच्या बंगल्यांत आम्हांला जायचें आहे. व खुद्द माणेकबाईही आम्हांबरोबर आली आहे असें मी म्हणालों. ते ऐकतांच त्याच्या शेजारी असलेल्या एका गृहस्थानें आह्मीं चोर नाहीं अशाबद्दल त्या माणसाची खात्री केली, व तुझीं आतां अमक्या अमक्या रस्त्यानें जा ह्मणजे त्या बंगल्याच्या पुढल्या बाजूला जाल असें त्याने मला सांगितलें. " 66

चला तर येथून लवकर निघून गेलेलं बरं; नाहींतर भलतंच एखादं

संकट यायचं. अरे, पण त्या दोघी कुठे गेल्या ? " ' बाईसाहेब, " पिराजी शिरीनला धीर देऊन म्हणाला, आपण अगदीं भिऊं नका. त्या दोघींनां आतां मी हांका मारून आणतों. " अर्से सांगून तो पुन्हां पलीकडच्या दारांतून बाहेर गेला. इतक्यांत कोणी तरी मोठमोठ्यानें ' चोर चोर' अर्से ओरडतांना मी ऐकलें ! मी व शिरीन घाबरून इकडे तिकडे पाहूं लागलों तोंच " अरे, हराम- खोरांनो, चार पांच हजारांची नथ विकत घेतों असं मला खोटंच सांगून कालपासून मला येथें कोंडून ठेवलत; आणखी आतां मी एकटा आहे असं पाहून माझ्या जवळच्या जिनसा हिरावून घेतल्यात, आणखी मलाच मारतां काय ? ओय् ओय् ओय् ! अरे नाहीं; तुमचें हें ठिकाण मी कोणालाही सांगणार नाहीं; पण मेहेरबानी करून आतां मला जीवदान या " असें आमच्या आसपास कोणी तरी मोठमोठ्यानें सांगत असून मधून रडत असल्याचें माझ्या कानीं आलें. इतक्यांत माणेकबाई घाबया घाबऱ्या आमच्याकडे धांवत आली; व रडत रडत सांगू लागली “घांवा हो धांवा ! माझ्या ल्यूसीला कोणी चोरांनीं गांठलं आहे ! आणखी पिरा- जीला धरून ते एकसारखा मारताहेत ! पिरोजशेट, चला हो तुझी तरी आमच्या मदतीला ? " असें ह्मणत ती सैरावैरा धावूं लागली ! तिला