पान:मयाची माया.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

२९ त्या प्रकारचें साहसही करावे लागले तरी त्यापासून तुझ्या एका कैसा- लाही धक्का पोचणार नाहीं हें तूं कधीही विसरूं नको ! " तिचें बोलणे संपते आहे तोंच आह्मीं बसलो होतों तेथें पिराजी आला व घाबय घाबऱ्या शिरीनला ह्मणाला “बाईसाहेब, आज आपण रस्ता चुकून भलत्याच ठिकाण आलो आहो. आपण समजत होतो त्याप्रमाणें माणेकबाईंच्या बंगल्याची पिछाडीची ही बाजू नव्हे. कारण पलीकडच्या दारापाशीं जाऊन त्यांच्या रामोशाच्या नांवानं पुष्कळ हांका मारिल्या; पण कोणीच ओ देईना ! ह्मणून आसपासच्या लोकांना जागे करून मीं त्यांना विचारलें; पण शेजारी असणारा बंगला दुसऱ्याच गृहस्थाचा आहे. तुझी अपरात्रीं भलत्याच ठिकाणी चुकून आला आहां असे त्यांनी मला सांगितलें. त्यापैकी एक गृहस्थ मला दरडावून ह्मप्पाला, मालकाला न विचारतां तुझी भलत्याच्याच घरांत रात्रीचे चोराप्रमाणे शिरला तेव्हां तुझाला पोलीसच्या स्वाधीन करायला काय हरकत आहे ? एखाद्याच्या घराचें दार रात्रीं अपरात्र चुकून उघडे राहिले ह्मणजे पाहिजे त्यानें आंत शिरावें कीं काय ? " " अग बाई, ' शिरीन घाबरून विचारूं लागली. हें काय ? आज है भलतेंच झालं ? आतां काय बाई करायचें ? ” i " " बाईसाहेब, ” पिराजी पुढे सांगू लागला " त्याच्या दरडावण्यानें मी तर अगदीं भिऊन गेलों. मीं त्या गृहस्थाला पुष्कळ सांगून पाहिलें कीं, महाराज, या शहरांत आह्मीं नवखे आहों. रात्री आह्नीं नाटकाला गेलों होतों व परत येतांना गाडीवाल्यांनी भलत्याच ठिकाणी आणून सोडलें व ही त्या बंगल्याची पिछाडी आहे असें आह्मांला सांगितलें. आमच्या शेटच्या बंगल्याकडे - त्याच्या मागील बाजूला, आह्मीं ज्या घरांतून इकडे आलों तशाच प्रकारचें घर आहे. बाहेरून नवख्या माणसाला ते सहज ओळखण्यासारखें नाहीं. त्यामुळे आह्मी चूकून आंत शिरलों हैं। ऐकतांच त्या गृहस्थानें विचारले ' मग त्या बंगल्याच्या पुढच्या दरवाजाशींच तुझीं कां गेला नाहीं. मला वाटते यांत कांहीं तरी लबाडी आहे ! " - यावेळीं शिरीनची चर्या भीतीनें फारच घाबरी होऊन गेली; व कांपन्या