पान:मयाची माया.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६

प्रसंग ४ था.

  • तिचें ह्मणणें मीं मान्य केलें ! आणि आह्मी सर्वजण त्या बोळांतून

जाऊं लागलों. माझ्याजवळ असलेली दागिन्यांची पेटी मीं आपल्या खार्केत घट्ट धरून ठेविली होती. पेटी जिवापलीकडे जपून ठेवावयाची असा माझा संकल्प होता; पण चालतांना माझे झोंक जाऊं लागल्या- मुळे ती कांहीं वेळ शिरीनजवळ दिली; व शिरीनचा हात धरूनच मी चाललो होतों. डाव्या उजव्या बाजूला वळतां वळतां कांहीं वेळानें आह्मी एका दुमजली घराच्या दाराशीं गेलों. ऑपोलो बंदरवर पाहि लेला ल्यूसीचा शिपाई यावेळीं दरवाजापाशीं उभा होता ! त्याला ल्यूसीने विचारले " अरे, ती शिरीनबाईच्या पिरोज शेटजींची कपड्यांची पेटी चुकून आपल्या गाडींत आली होती ती त्यांची त्यांना दिलीस की नाहीं ? ती लवकर शिरीनबाईंच्या स्वाधीन कर ह्मणजे ती त्या पिरोज शेटकडे पाँचवितील. " 66

पण तूं घरीं नाहींच कां गेलीस अजून ? " शिरीनने तिला

विचारलं. 66 अग हो. " ल्यूसी ह्मणाली, पहिल्यानें मी घरीं गेले; पण पाहतें तो आई कांहीं अजून आली नव्हती. तरी तिनें मला एक चिट्ठी लिहून ठेवली होती. ती मीं वाचून पाहिली तो तिचें कांहीं एक अतीशय मह- त्वाचे काम काल रात्रीं करायचें होतें; व 'तूं घरीं येतांच ते तूं लवकर कर; मला यायला अंमळ उशीर होईल, असे तिनें लिहिले होतें ह्मणून मी न थांचतां लागलीच निघालें. मला याच बाजूला जायचें होतें. तेव्हां झटलें कीं, तुझ्या पिरोज शेटची कपड्यांची पेटी चुकून माझ्या गाडींत रात्रीं आली होती ती लागलीच तुझ्याकडे पोंचती करावी. तूं अजून कांहीं घरी गेली नसशील अर्से समजून इकडेच आले. " दरवाजांतून आह्मीं सर्व मंडळी आंत गेलों. आंतल्या अंगाला चांगली मोठी इमारत असेलसें मला वाटत होतें; पण पाहतों तों आंत जातांच पुन्हां एक लांबच्या लांब जागा आझाला ओलांडून जावें लागले. पुढे जातों तो पुन्हां एक बैठें घर दिसलें; व त्यांत आलीं सर्व मंडळी शिरलो. काय ? असल्या या अमंगळ जागेत एखादा श्रीमान् गुजराथी शेटिया रहात असेल ? माणेकबाईचें हे असले दरिद्री घर ! मदिरेच्या गुंगीत