पान:मयाची माया.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

ही मंडळी चुकून भलत्याच घरांत तर नाहींना शिरली. त्या जागेच्या विलक्षण स्थितीबद्दल नानाप्रकारचे विचार माझ्या मनांत येत होते तोंच माणेकचाई त्या शिपायाला जरा दरडावून ह्मणाली " पिराजी, अरे असल्या या भलत्याच वाटेनें मंडळींना तूं कां बरें आणलेस ? बंगल्याचा पुढला दरवाजा अजून बंदच आहे की काय ? अरे त्या रखवाल- दाराला, रामोशाला दरवाजा उघडायला सांगायचं होतंस कीं नाहीं ? आतां या बाजूनें जाऊन बंगल्याचा मागचा दरवाजा उघड जा ह्मणजे मंडळींना इकडूनच बंगल्यांत घेऊन जाऊं. "

हैं ऐकतांच तो शिपाई निघून गेला; पण बराच वेळपर्यंत कांहीं परत

आला नाहीं. आह्मीं आतां त्याच ठिकाणी काहीं वेळ बसून राहिलों ती जागा ह्मणजे केवळ जुनी, पडकी अशा प्रकारची तीन चार खणाची एक खोली होती. दोन तीन मोठमोठे दिवे लावलेले होते त्यामुळे तेथें उजेड मात्र उत्तम प्रकारचा पडला होता. माणेकबाईनें सांगितल्याप्रमाणें बंगल्याचा दरवाजा उघडून तो शिपाई आह्माला बंगल्यांत घेऊन जाईल अर्से मी समजत होतों ! इतक्यांत गाडींतून पिरोज शेटजीच्या कप- ड्यांची ह्मणून आपल्या बरोबर ल्यूसीने आणलेली पेटी शिरीन्ने आतां उघडली; व तींतून चार ग्लास, व्हिस्कीची, सोडावॉटरच्या वगैरे बाटल्या काढल्या; आणि पुन्हां आह्मी सर्वांनी एकदां मद्यपान केलें ! यावेळी माणेकबाईनें पूर्वीप्रमाणे मुळींच आढेवेढे घेतले नाहींत, व सोडावॉटर म्हणून तो मविरेने भरलेला ग्लास तिर्ने सहज झोंकला. हे पाहून मला बरेंच आश्चर्य वाटलें ! मी ज्या जागीं बसलों होतों तेथें आतांपर्यंत जिवाच्या पलीकडे जतन करून ठेवलेली शिरीनच्या दागिन्यांची पेटी कांहीं वेळ ठेविली; कारण मीं केलेले सुरापान आपल्याला सोसत नाहीं; आतां आपल्याला खास ओकायला होणार असे मला वाटलें; व ह्मणून मी लागलीच दाराच्या बाहेर गेलों व संध्याकाळपासून पोटांत दोन तीन वेळ भरलेले सर्व मय आता ओकून पडलें. २७

या गोष्टीकडे सर्व मंडळींचें लक्ष होतेंच. मला ओकायला झालें असें

पाहतांच माणेकबाईनें तोंड वगैरे धुण्यासाठी ताबडतोब मला पाणी आणून दिलें. मदिरा ओकून पडल्या नंतर थोड्या वेळाने मला काहींसें,