पान:मयाची माया.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयावी माया.

पारशी गृहस्थ माझ्या नुतांच दृष्टीस पडला होता; व त्यामुळेच माझें मन अग घाबरून गेले होते. तोच गृहस्थ आतां आमच्या पुढच्या बाजूला उभा आहे असे दिसतांच पुन्हां त्याच्या भयानें माझें चित्त एकदम अस्वस्थ होऊन गेलें ! अरे रे, घात झाला ! असे शब्द एकाएकी माझ्या तोंडांतून निघून गेले. ते मीं का उच्चारले हें माझें मला कांहींच कळले नाहीं. पण ते शब्द माझ्या तोंडांतून निघतांच अद्याप थोडा अवकाश आहे " असें कोणी तरी मोठ्यानें ह्मणाल्याचा मला भास झाला; व तें काम पिरोजवेंच असावें असें माझ्या घाबरून गेलेल्या मनानें पक्के ठरविलें ! आतां त्याच्या तावडींतून निसटून जाणे मला अगदींच शक्य नव्हतें ! त्याच्या शिरीनजवळ मी बसून आलों हैं त्यानें चांगलें पाहिलें होतें ! त्यानें दया केल्यावांचून आपला प्राण वाचत नाहीं असें मीं ठरविलें ! 66 प्रसंग ४ था. ..माणेक, शिरीन व मी गाडींतून उतरलों. आमच्या पुढेंच पिरोज व ल्यूसी उभी होती. ल्यूसीला पाहतांच माणेक व शिरीन तिच्याजवळ गेल्या. ज्या घरापाशीं गाड्या उभ्या राहिल्या त्याच्या जवळच एक लहान बोळ होता. त्यांतून आह्मांला जायचें होतें. तो पारशी तरुण नुक- तांच बोळांत वळला होता. मी आपल्या गाडीपाशींच अजून उभा होतों, शिरीननें 'पिरोज, ' अशी हांक मारिली. ती अर्थात बोळाकडे वळ- लेल्या तिच्या प्रियकरालाच उद्देशून होती याबद्दल आतां मला शंका उरली नाहीं. आतां दगा होण्याची हीच वेळ आहे असे समजून मी मागच्यामार्गे हलकेच पळून जाणार होतों; पण इतक्यांत शिरीन घाई- घाईनें माझ्याजवळ आली व माझा हात धरून मला ह्मणाली आतां तूं बराच दमला आहेस असे दिसते. तेव्हां आपण आपल्या माणेक बाईच्या घरीं थोडा वेळ विश्रांती घेऊं आणि मग तुझ्याबरोबर आपला शिपाई देऊन मी तुला तुझ्या घरी पोंचवीन. " 66