पान:मयाची माया.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ३ रा.

दिलेली तिच्या दागिन्यांची पेटी ) मोठ्या प्रेमानें आपल्या बगलेत घेतली व तिच्या बरोबर जावयाला मी तयार झालों ! २४ हे पाहतांच शिरीननें प्रथम आलेल्या गाडीवाल्याला आमच्याजवळ गाडी आणायला ल्यूसीच्या त्या शिपायाला सांगितले. मागून आलेल्या गाडींत ल्यूसी बसला; व तिचा तो शिपाई कोचमन शेजारी बसला; आणि ती गाडी मोठ्या सपाट्यानें निघून गेली. आमच्या गाडीत शिरीन, माणूक, आणि मी लागलीच बसलों; व आमचीही गाडी जोरानें चालू लागली.

अगोदरच मुंबईसारख्या अफाट शहरांत मी अगदीं नवखा, खेडवळ,

त्यांतून रात्रीची वेळ ! शिवाय माझ्यावर मंदिरे आतां आपला पूर्ण अंमल बसविलेला ! मर्ग काय विचारावें ! गाडी कोठें जात होती है मला नीट कळेना ! बोरीबंदरपर्यंत गाडी आल्याचें मला साधारण भान होते; पण त्याच्यापुढे आमची गाडी किती लांब गेली, किंवा ती कोणकोणत्या रस्त्यानें वळली हे लक्षांत येण्याइतकी शुद्ध माझ्यांत राहिली नव्हती ! गाडीमध्ये एका अंगाला शिरीन व मी आणि आमच्या समोर माणेक बसली होती. शिरीन माझ्या अगदी जवळ बसली अस ल्यामुळे तिच्या सान्निध्याने मला मधून मधून अतीशय आनंद होत होता व ते मला चांगलें कळत असल्याचा भास होई ! शिरीनसारख्या सौंदर्य- पूर्ण तरुणीचा आपल्याला अनायास विलक्षण लाभ झाला असे वाटून एका विलक्षण प्रकारच्या आनंदानें मी त्यावेळी अगी बेहोष होऊन गेलो होतों ! भवितव्यतेने आपल्यासाठी पुढे कोणती योजना केली आहे याची नुसती कल्पनाही मला त्यावेळी आली नाहीं ! मी आपल्या बि-हाडी परत जाईपर्यंत सर्व कांहीं आनंदी आनंद होऊन गेला होता. असो !

पुढें थोड्याच वेळांत आमची गाडी एका घरापाशीं उभी राहिली.

इतका वेळ आमच्या पुढे चालत असलेली एक गाडी त्याच घराजवळ नुकतीच थांबली होती; व तींतून एक पारशी तरुण, व एक युरोपियन तरुणी- अर्थात ल्यूसी खाली उतरली. पारशी गृहस्थानें गाडींतून एक पेटी काढली व गाडीवाल्याचे भाडें देऊन टाकलें. गाडींतून उतरलेला