पान:मयाची माया.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

चांगलेंसें दिसलें नाहीं; पण कांहीं काळ्या रंगाचे कपडे, बूट व पार्शी लोकांच्या टोपीसारखी एक टोपी होती असे पाहिल्याचें मला आठवतें ! हे कपडे कोणत्या तरी पारशी गृहस्थाचे असाव असा मीं तर्क केला; व नुकत्याच येथून गेलेल्या तरुणाचे तर हे कपडे नसतील ना ? अशी माझ्या संशयग्रस्त मनांत एकाएकी कल्पना उद्भवली ! तो तरुण पिरोजच होता असें ह्मणावें तर त्याच्या अंगात असलेले कपडे या पेटींत येण्याचे कारण काय ? बरें तसे नसले तरी हे कपडे या शिपायानें काय म्हणून आणले असावे ? कदाचित् फेटमवून दुसरी- कडे जातांना शिरीनचा बाप दुसरे कपडे घालून गेला असेल; व त्यानें २१ ढन ठेवलेले हे कपडे त्याचा हा शिपाई परत घरी घेऊन जात नसेल असें तरी कशावरून ? बरें तसें असतें तर शिपाई बंदरावर कां यावा ? आपण इतक्या अपरात्री बंदरावर हवा खात बसणार आहों असे शिरी- ननें याला सांगून ठेवले होते की काय ? पण फेटमधून परत येतांना मी जर बंदराकडे वळलों नसतो तर शिरीन तरी इकडे कशाला आली असती ? सारांश, माझ्या मनांत अनेक प्रकारचे कल्पनातरंग एक- सारखे येऊं लागले; व सर्व गोष्टींचा विचार करीत असतां मी अगदींच बावरून गेलों. हे काय गौडबंगाल आहे ते मला कांहींच कळेना !

शिपायानें ट्रंक बंद करून गाडींत नेऊन ठेविली; व तो ल्यूसीला

हलक्या आवाजानें ह्मणाला “ ल्यूसी, बाबा आणि मेमसाब घरीं गेल्या असतील; आतां तुलीही पण चलावं. १७ शिपायाचें बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटलें ! हा शिरीनचा शिपाई असावा असें मी समजत होतों ! कारण ल्यूसीच्या शिपायानें पारशी गृहस्थाच्या कपड्याची पेटी आपल्या बरोबर आणण्याचे प्रयोजन नव्हतें ! ल्यूसीला तो घरां घेऊन जाण्यासाठी आला आहे असे कळतांच मी अधिकच घोंटाळ्यांत पडलों.

हें ऐकतांच ल्यूसी एकदम उभी राहिली व आह्मांला ह्मणाली " आतां

मला घरीं गेलेंच पाहिजे. शिरीन, तुझे पिरोजशेट विलायतेला जाण्या- पूर्वी मला तूं कळविशील ना ? पिरोज शेटना पहावयाला सांपडल्या-

मुळे आ

झांला खरोखरीच फार आनंद होत आहे. बरें तर आतां मी