पान:मयाची माया.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ३ रा.

असें नाहीं; तरी पण तो ग्लास तोंडाला लावतांना ती अर्से का म्हणाली हैं मला समजलें नाहीं !

याप्रमाणे त्या तिघींचे बोलणे चाललें होतें; पण होतां होईल तों तोंडा-

वाटे एक अक्षरही काढायचें नाहीं असा मीं बेत केला होता. वास्तविक पाहतां शिरीनच्या प्रियकराबद्दलची मला जी भीती वाटत होती ती आतां बरीच नाहींशी होत चालली होती. तिच्या बरोबर फेरीमध्ये बसून जलक्रीडा करीत असतानांही तिच्याशीं मी फारच थोडें बोललो होतों; व तसें करीत असतांना मी आपला नेहमींचा खरा आवाज तिला कळूं न देण्याविषयीं शक्य तितका यत्न करीत होतो; कारण हा आपला प्रियकर पिरोज नसून दुसराच कोणी तरी आहे अशी तिला यत्किंचितही शंका आली तर आपला सर्वस्वी घात होईल अशी मला मोठी भीती वाटत होती.

आह्मीं सुरापान करीत असतांना मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग टाळीत

होतों तो तरी याच भीतीमुळे होय. समुद्रांतून परत येईपर्यंत आपल्या मागोमाग शिरीनचा प्रियकर, अथवा दुसरा कोणी इसम आपला पाठलाग करीत येईल ही कल्पनाही माझ्या मनांत आली नव्हती; पण त्या पारशी तरुणाला गाडींतून उतरतांना पाहतांच माझ्या मनांत पूर्वी आलेल्या भीतीनें अधिकच भयंकर स्वरूप धारण केलें. माझा शत्रू - जो दृष्टीस पडतांच हाच तो शिरीनचा प्रियकर पिरोज अर्से मला वाटलें तो-नंदरावरून परत गेल्याला बराच वेळ झाला. यावरून एक तर तो पोलीसला आणायला गेला असावा किंवा शिरीनशी त्याचा आपल्याला वाटत होते तशा प्रकारचा बिलकुल संबंध नाहीं असे मी समजलों व आपल्या संकटाचे स्वरूप आतां बरेंच सौम्य झालें अर्से मला वाटू लागले; पण इतक्यांत दुसरी एक गाडी येऊन आमच्याजवळ उभी राहिली ! व तिच्यांतून एक इसम खाली उतर- तांना दृष्टीस पडला. त्या इसमाच्या अंगांत खाकी रंगाचा अंगरखा असून त्याच्या पायांत त्याच प्रकारची विजार होती. त्याच्या डोकीला शिपाई थाटाचें तांबडें पागोटें होतें. त्याने आपल्याबरोबर एक बरीच मोठी कातड्याची पेटी आणली होती. ती त्यानें शिरीनपाशीं आणून उघडली; व शिरीनजवळ हँडबॅग वगैरे असलेले सामान त्यानें त्या पेटीत चट्कन भरलें. शिरीनचें सामान ठेवण्यापूर्वी त्या पेटींत काय काय होतें हैं मला