पान:मयाची माया.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२

प्रसंग ३ रा.

जातें. उग्र किंवा परवां तूं मला भेटशील तर बरे होईल. पण तुला सांगितलेली गोष्ट मान विसरूं नको हो. ठरल्याप्रमाणे शक्य ती मदत करण्याचे माणेकनें कबूल केले आहे. तुझ्या बाबांच्यापाशीं मीं तिच्या- बद्दलची गोष्ट काढून ठेवली आहेच. ते जी काय थोडी फार रक्कम देतील ती मला उद्यां परवां तूं आणून दे झणजे झालं. " माणेक मध्येंच सांगू लागली " माझ्या बाबांनी मिसेस द्वारकाबाईला मदत ह्मणून मेमसाहेबांना देण्यासाठी माझ्याजवळ तीनशे रुपये देऊन ठेविले होते ते मी तीन चार दिवसांपूर्वीच त्यांना नेऊन दिले. एकंद- रीनें अगदींच निराश्रित झाली ह्मणायची ! ”

"

हं " दुःखाचा सुस्कारा टाकून ल्यूसी म्हणाली " करते काय विचारी !

पोट भरायला साधन नाहीं. कोण ही तुमच्या हिंदू लोकांची वेडी सम- जूत ! आपलं पोट भरण्याचा एखादा उद्योग धंश चायकांना शिकवून ठेविला तर त्यांत त्यांचं काय गाठोडं बुडत असेल ते त्यांचं त्यांनाच माहीत ! बायका विधवा झाल्या म्हणजे त्यांनी काय करावं ? दुस-या देशांमधून पहा बायका कशा पुरुषाप्रमाणे पाहिजे तो धंदा करून आपला चरितार्थ चालवितात ! बरें तें असो. " 66 " अग पण ल्यूसीबाई " शिरीन् तिला ह्मणाली “आह्मीही निघालोंच. आम्हाला कांहीं येथें रहायचें नाहीं आज " ल्यूसीला याप्रमाणे सांगून ती माझ्याकडे वळली व माझा हात धरून लडिवाळपणाने मला म्हणाली “पिरोज, आमची एक विनंती आपण मान्य कराल कां ? आपल्याला सगळ्यांना आतां आपापल्या घरोंघरीं जायचें आहे; पण जातां जातां या आमच्या माणेकला तिच्या घरीं पोंचती करून नंतर आपण आपल्या घरीं व मीही आपल्या घरी जावें असें आमच्या मनांत आहे. " यावेळी शिरीनच्या मोहक चर्येवर अत्यंत रमणीय असें हास्य विल- सत होतें. तिच्या अंगावर असलेले दागिने अतीशय चमकत होते. त्यांतल्या त्यांत मी तिला नुकतीच दिलेली अत्यंत मौल्यवान् अशा हिन्याची अंगठी तिनें आपल्या डाव्या हातांत घातली होती; व ती तिला फारच आवडत असावी असे दिसलें; कारण माझ्या त्या अंगठीकडे ती