पान:मयाची माया.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

" माणेक, मी ह्मणते कीं, आतां आपण तिघीही माझ्याच घरीं जाऊं. आणखी सकाळी उजाडण्याच्या अगोदर मी तुझाला तुमच्या घरीं पोंचत्या करीन ह्मणजे झालं. " 66

" शिरीन तुमचं दोघींचं आपलं ठीक आहे " माणेकबाई तिला

झणाली, " ल्यूसी काय किंवा तूं काय ? तुझी किती वेळ जरी घराबाहेर राहिला, आणखी पाहिजे तेव्हां घरीं गेला तरी तुझी स्वतंत्र आहां. आपल्या आईबापांच्या तुझी आवडत्या ! तुझाला रागें कोण भरणार आहे ! पण माझं कुठे आहे बाई तसं भाग्य ! त्यांतूनही तूं ह्मणतेस तसं मी केलं असतं; पण माझे बाबा लिमडीला गेले आहेत ते आज सकाळच्या मेलनें दिवस उगवण्याच्या अगोदरच परत येतील, त्यावेळीं मी घरीं नाहीं असं त्यांनी पाहिलं ह्मणजे ते रागावतील. तेव्हां आतांच्या आतांच मला घरी गेलं पाहिजे. " "

“छे, छे, माणेक ” ल्यूसी मध्येंच ह्मणाली “तुझी समजूत चुकीची आहे.

तुला वाटतं तितकं या बाबतींत मला सुख नाहीं. मी आज इतक्या रात्रीं- पर्यंत बाहेर राहिलें हीच मोठी चूक झाली. आई मला उद्यां काय ह्मणेल याची मला मोठी धास्ती वाटते आहे. मागं अशीच एकदां मी आईला न विचारतां एका मैत्रिणीच्या घरीं राहिले होते तेव्हां दुसरे दिवशीं आई मला फार राग भरली. आतां मी जरी एकटी घरी गेलें तरी कांहीं मोठीशी हरकत नाहीं म्हणा - " " मी नाहीं गं बाई असल्या रात्रीं एकटी जायची. शिरीन्, माझ्या घरापर्यंत तूं मला नाहीं कां पोंचविणार ? हें पहा, तूं माझ्या बरोबर आलीस ह्मणजे कीं नाहीं, यायला इतकी रात्र कां झाली असं मला घरी कोणी विचारणार दिखील नाहीं. " असे सांगतांना तिच्या पुढें शिरीननें ठेवलेला ग्लास माणेकनें तोंडाला लावला; पण तो न पितां तिनें तसाच जमीनीवर ओतला; व रागाचा आविर्भाव आणून ती शिरी- नला म्हणाली ." अगं बाई है काय हें ! आजच्या सोड्याला घाण कसली येते आहे ही ! मला तर बाई अगदीं ओकारीच आली ! "

शिरीन् ग्लासामध्ये व्हिस्की ओतत असतांना माणेकनें पाहिले नव्हतें