पान:मयाची माया.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची भाया.

१७ आतां एकदम माझी भीती नाहींशी होऊन संकटाला तोंड देण्याचे धैर्य करून मी आपल्या शत्रूशीं- शिरीनच्या प्रियकराशीं- दोन हात कर ण्यासाठी मोठ्या अवसानानें किंचित् पुढे सरसावलों; व त्याच्या अंगावर चाल करून जाणार तोंच शिरीन माझ्याजवळ आली. माझ्या प्रतिस्पर्ध्यार्शी झगडण्यासाठी मी जरी आपल्या अंगांत उसने अवसान आणले होतें; तरी पण भयानें माझें सर्वांग अजून हुडहुडी भरल्याप्रमाणे थरथर कांपत होतें. आपण अतीशय भिऊन गेलों आहों हें शिरीनला समजुं देणे इष्ट नाहीं असें जरी मला वाटत होतें तरी माझ्या सर्व शरीरामध्ये त्यावेळीं एकाएक उद्भवलेला भीतीचा विकार नाहींसा करणे अगदींच अशक्य होऊन गेले होतें.

शिरीन माझ्या अगदर्दी नजीक आली व माझें शरीर लट्लट् कांपत

आहे असे पाहून ह्मणाली “ पिरोज, तुला फार थंडी वाजत असावी असें दिसतें. कोण मेला हा आजचा गारठा ! पिरोज, थंडीनेंच कां तुझे हातपाय कांपताहेत ? आपण आतां पुन्हां थोडीशी शराब घेऊं ह्मणजे तुझ्या अंगांत थंडीची भरलेली ही हुडहुडी तेव्हांच नाहींशी होईल. आणखी आपण लागलीच घरीं जाऊं ह्मणजे झालं. 39 इतकें सांगून आपली हँडबॅग तिनें लागलीच उघडली आणि दोन ग्लास व व्हिस्कीची बाटली बाहेर काढून दोन्ही ग्लासांत तिनें थोडथोडी मदिरा ओतली. तिच्या बोलण्यावरून निदान यावेळी तरी कांहीं दगा- फटका होणार नाहीं असे मला वाटलें. तिकडे तीं तिन्हीं माणसें आपापसामध्यें कुजबुजण्यांत अगदीं गर्क होऊन गेली होती. थोडक्याच वेळांत त्यांचें काय ठरलें असेल तें असो. पण तो पारशी तरुण गाडीवाल्यापाशी गेला व त्याला हलकेंच काय सें सांगून तो मोठ्या झपाट्यानं चालू लागला; व पाहतां पाहतां कोठें दिसे- नासा झाला ! आतां शिरीनच्या दोन्हीं मैत्रिणी आमच्याजवळ येऊन बसव्या व माझ्याकडे पाहून त्या तिवी तरुणी एकाएकी मोठमोठ्यानें हंसूं लागल्या ! यावेळी अर्से हंसण्याचे त्यांना काय कारण वाटले असेल तें त्यांचें त्यानांच माहीत ! त्यांचे चेहरे त्यावेळी कांहीं चांगले दिसण्या- 3