पान:मयाची माया.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ३ रा.

याप्रमाणें त्यावेळी भावी संकटाची माझ्या मनानें एकाएकी दहशत घेतली. पण तशा स्थितीतही चटकन् पळून जाण्याचा मी निश्चय केला; व आपल्या पायांना गती देणार तोच एक पारशी तरुण गाडींतून खालीं उतरतांना माझ्या दृष्टीस पडला. त्याला पाहतांच आपला काळ आला असें वाटून मी अगदीं गर्भगलित झालों व माझ्या शरीराला घाम सुटला. प्रसंग ३ रा.

पारशी तरुण गाडींतून उतरतांच त्या स्त्रियांच्या जवळ गेला व

त्यांच्याशी थोडावेळ कांहींसें कुजबुजला आणि पुन्हां गाडीकडे वळला. है पाहतांच आतां हा येथून निघून जाणार असे मनांत येऊन मला थोडासा धीर आल्यासारखे वाटू लागले; तोंच त्या तरुणानें गाडीमधून एक हँडबॅग काढली व ती शिरीनजवळ देऊन तो पुन्हां गाडीकडे वळला.

हे काय गौडबंगाल आहे हे मला समजेना. हा तरुण जर खरोखरी

शिरीनचा प्रियकरच असता तर त्याच्या शिरीनबरोबर मला पाहतांच तो स्वस्थपणानें राहिला नसता, अर्से मला वाटून मी आपल्या घाबरून गेलेल्या मनाला धैर्य दिलें; पण ज्याअर्थी तो गाडींतून उतरतांच शिरीन- जवळ जाऊन कुजबुजला त्याअर्थी त्याच्या मनांत माझा सूड घेण्या- विषयींचा कांहीं तरी खोल विचार - कीं जो एकदम मला समजणार नाहीं असा विचार - आला असावा असें मी आपल्या मनाशी ठरविले व तेवढ्या वेळा पुरती माझी कल्पना बरोबर आहे असे मला दिसून आलें. कारण त्या तरुणाने दिलेली डबॅग हातांत घेऊन लागलीच शिरीन एकटीच माझ्याकडे आली, व माझ्याकडे पहात पहात तिनें 'पिरोज १ अशी मोठ्यानें हांक मारिल्याचा मला भास झाला. आतां या संकटांतून जीव बचावून बि-हाडीं परत जाण्याची आशाच नको अर्से मला पक्के कळून चुकले. तिनें मारिलेली हाँक माझ्या कानीं येतांच माझें सर्व लक्ष्य गाडीकडे वेधून गेलें; व गाडींतून पुन्हां तो तरुण बाहेर येऊन त्या दोन स्त्रियांजवळ जाऊन उभा राहिला असे मला दिसलें.