पान:मयाची माया.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

१५ नसता तर माझ्यावर असा दुर्जर प्रसंग ओढवण्याचें कांहीं कारणही नव्हते. सारांश, त्यावेळीं मी समजून उमजून करूं नये अशी गोष्ट करायला तयार झालो होतों; व होतां होईल तो त्या तरुणीचा नाद न सोडही तिला घश करावची; पण त्या गोष्टीचे दुष्परिणाम मात्र चुकजि- ण्याची कांहीं तरी अजब युक्ती काढावयाची असा मी आपल्या मनाशीं निश्चय केला !

याप्रमाणे बराच वेळ मी विचार करून पाहिला; पण कोणताही त्रास

भोगावा न लागतां शिरीनला वश करण्याची युक्ती कांहीं मला सुचेना. पण नाना प्रकारच्या भीतिप्रद कल्पनांनी मात्र मनाला अतीशय गांगरून टाकलें. तेथें उभ्या असलेल्या गाडींतून शिरीनचा प्रियकर पिरोज तिच्या शोधासाठी आला असावा; शिरीनशीं आपण केलेले कपट त्याला कळतोच तो या मयंकर अपराधाबद्दल आपला सूड घ्यायला कमी कर णार नाहीं असें ती गाडी दृष्टीस पडतांच मला एकाएकीं वाटलें व कल्प- नेनें बनविलेलें पिरोजचें भयानक स्वरूप मला त्यावेळीं जिकडे तिकडे दिसूं लागलें. भयानें एकाएकीँ माझे हातपाय लट्लट् कांपू लागले. आतां आपली कोहीं धडगत दिसत नाहीं असें मला कळून चुकलें. वास्तविक मी जातीचा कांहीं अगवींच भित्रा नव्हतों; व माझा कोणत्याही प्रकारचा अपराध नसतां केवळ यहच्छेने माझ्यावर एखादें संकट आले असते तर मी यत्किंचितही न डगमगतां त्याला धर्मानें तोंड देण्याला मार्गे पुढे पाहिले नसतें व त्यामध्ये मला कदाचित् यशही आलें असतें. पण त्यावेळी माझे सर्व धैर्य एकाएकी ती गाडी पाहतांच गळून गेलें ! मनुष्य- प्राणी स्वभावतः कितीही धैर्यवान् असला तरी कोणत्याही बाबतींत त्याचा स्वतःचा कांहीं अपराध असला, सदसद्विवेक बुद्धीला न जुमानतां त्यानें जर एखादें पापाचरण केले असले, दुसऱ्या प्राण्याला त्यानें जर विनाकारण कोणत्याही प्रकारचा त्रास दिला असला तर त्याचें सर्व धैर्य, बल, अवसान लुलें पडावयाचें असा नियम आहे. शिवाय तेवढ्या वेळा- पुरता जरी त्यानें संकटापासून मोठ्या युक्तीप्रयुक्तीनें, कावेबाजपणानें आपला बचाव केला तरी स्वतः आचरिलेल्या निंद्य कर्माचें त्याला प्रायश्चित्त मिळाल्यावांचून रहात नाहीं, हे मला माहीत नव्हतें असें नाहीं; असो.