पान:मयाची माया.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

प्रसंग २ रा.

त्या एका अंगाला गेल्या व तेथें मला ऐकू न येईल अशा बारीक आवा- जानें कायसें बोलत सुमारें पांच सात मिनिटें उभ्या होत्या.

या वेळीं सुमारें दोन वाजून गेले असावेत. बंदरावर आमच्याप्रमाणे

हवा खाण्यासाठी व आपल्या मनाची हौस नानाप्रकारच्या विलासांनीं पुरविण्यासाठी आलेल्या कामी जनांची गर्दी मोडत चालली होती. तेथें जमलेली बहुतेक मंडळी आतां परत चालली होती त्यामुळे थोड्याच वेळांत जिकडे तिकडे अगदीं शुकशुकाट झाल्यासारखें दिसूं लागलें.

तेथें उभी असलेली निरनिराळ्याप्रकारची वाहनें आतां तेथून निघून

गेली. चंद्रबिंचानें उल्हसित झालेल्या सागराचा तो एकांत आतां आस- पासच्या शांततेमुळे अधिकच आल्हादकारक वाटू लागला. मध्येच आगगाड्यांच्या शिटांचा आवाज कानीं येई; पण त्यानें उत्पन्न झालेल्या प्रतिध्वमीमुळे आसमंतांत त्यावेळी सर्वत्र नांदत असणाऱ्या शांततेची कल्पना येऊन सृष्टिदेवीचें तें निरामय स्वरूप कौतुकानें पाहण्यांत दंग होऊन गेलेल्या माझ्या मनाला परमाबधीचा आनंद होत होता. 66 इतका वेळ माझ्या मनावर झालेला मदिरेचा अंमल कांहींसा कमी झाल्यासारखें मला आतां वाटू लागले होतें; व माझ्या पासून बऱ्याच अंतरावर उभ्या असलेल्या स्त्रिया काय बोलत आहेत हे जाणण्याची जिज्ञासा माझ्या मनांत एकाएकी उद्भवली. पण त्या तिघी तरुणी आपा- पसांत बराच वेळ कांहीं तरी कानगोष्टी करीत होत्या; व त्यांचें बोलणें मला ऐकू येण्यासारखे नव्हतें. तरी “ परवापासून मी तुला किती तरी वेळां सांगून पाहिलें; पण तूं कांहीं ऐकलें नाहींस. अशी कामें घाईनें होत नसतात. आतां थोडक्यांतच कांहीं भलता सलता प्रसंग आला नाहीं ह्मणजे मिळविली. " असे त्यापैकीं ऐकीनें उच्चारलेले शब्द माझ्या कान आले ! व लागलीच माझ्या मनांत एकाएकी एक प्रकारची भीति उत्पन्न होऊन, आपण आज केलेले कृत्य कांहीं ठीक नाहीं; थोडक्यांतच आप- ल्यावर कांहीं तरी संकट येणार अशी माझ्या भयभीत झालेल्या मनानें मला इशारत दिली. तोंच त्या पैकीं एक तरुणी किंचित् कापन्या आ- वाजानें ह्मणाली " होऊं नये अर्से चुकून झालें खरें; पण याला आतां उपाय काय करावा ? "