पान:मयाची माया.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मयाची माया.

दुसरी किंचित् धीर देऊन म्हणाली " मी मघाश्च सांगितलेली युक्ती आतां केली ह्मणजे झाले. माझ्या सांगण्याप्रमाणें तुझी जर वागाल तर "

तिचें हें वाक्य संपण्यापूर्वीच एक अतीशय वेगानें धांवत येणारी

घोड्याची गाडी एकदम आमच्या जवळ येऊन धडकली !

त्या वेळची माझी स्थिती लक्षांत आणली झणजे माझ्यावर आतां

कोणतें संकट येणार हैं कोणीही सांगू शकेल. दुसऱ्याच्या स्त्रीला भुरळ घालून वश करूं पाहणाऱ्या व विषयांध बनून गेल्यामुळे पाहिजे तो अभि- चार करायला सिद्ध होणाऱ्या नरपशूवर प्रायः कोणतें संकट येणार हें ज्याचें त्याला चांगले कळत असतें ! माझी आतां थोडक्यांतच काय वाट होणार हैं मला स्पष्टपणे समजून आले होतें. आह्मांवर ओढवणाऱ्या भावी संकटाची कल्पना त्या तिघी तरुणींनाही आलेली असून ती त्यांनी नुक- तीच व्यक्त केली होती; व तें संकट टाळण्याचा कांहीं तरी उपाय त्यांनीं योजिला असावा असे त्यांच्यामध्ये झालेल्या संवादावरून मीं ताडलें होतें. त्यांनी आपल्या विचाराप्रमाणे कांहीं तरी युक्ती काढून ठेवली होती हैं जरी खरे असले तरी त्यांनी मनांत आणलेल्या उपायानें माझें संरक्षण होणार नाहीं असें मला बाहूं लागलें. कारण माझ्यावर येऊं पाह- णाच्या संकटाची त्यांना कांहीं खरी कल्पना येणे शक्य नव्हतें. त्यांना वाटत असलेल्या भीतीचें कारण व माझ्यावर येऊं पाहणारें संकट या दोन्हीं गोष्टी अगदींच निरनिराळ्या होत्या. इतकी अपरात्र झाली तरी आपण आपापल्या घरोंघरी गेलों नाहीं यामुळे आपले आईबाप, आपल्या घरचीं मोठीं माणसे आपल्याला काय ह्मणतील या विचारावांचून घाब- रून जाण्याला त्यांना कांहींच कारण नव्हतें. त्या पारशी तरुणीने पिरो- जला-तिच्या प्रियकराला - भेटण्याची घाई करावयाची नव्हती असें तिच्याशी बोलणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या भाषणावरून मी समजलों व या तिच्या हातून झालेल्या चुकीमुळे तिचे आईबाप तिच्यावर रागाव- तील तेव्हां तिनें त्यांची क्षमा मागणे हाच उपाय त्यांनी आपल्या मनाशीं ठरवून ठेवला असला पाहिजे असें त्यांची एकंदर परिस्थिती ध्यानांत येतांच मीं ताडलें होतें. रात्रीं अपरात्री आपल्या तरुण मुलींनी बाहेर राहणें-- आपल्या बरोबर कोणीही मोठे माणून नसतांना बाहेर राहणे-