पान:मयाची माया.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ मयाची माया. बातमी लागण्यापूर्वीच विलायतेला जाणारी जी पहिली बोट तुला सांपटेल त्या बोटीनें परीक्षा देण्यासाठी जावेंस अशी माझी विनंति आहे. कारण परीक्षा पास होऊन तूं स्वतंत्र धंदा करूं लागलास झणजे मला माझे आईबापांचे मर्जीविरुद्ध सुद्धा लम्र करण्याला मुळींच अडचण पडणार नाहीं. " मी ती कर्णे पाहातांच मनांत दचकहों. एकदार माझ्या मनांत संशयही आला. परंतु, तीं हातांत वेऊन पहातांच चंद्रप्रकाशांत त्यांच्या प्चमकत असलेल्या तेजानें तो क्षणापत नाहींसा झाला. हा वेळपर्यंत चाललेल्या अद्भुत प्रकारांत हा एक वचा चमत्कार पाहून मी अधीक गोंधळलों व हा कांहीं जादूचा महार आहे की काय असे मला वाटू लागले. तथापि मी यावेळी मदिरावश झालो होतो; पण त्या स्थितीतही विशेष गोंधळून न जातां कांहीं तरी बोलून सोंगाची बतावणी उत्तम रीतीनें करीत होतों. तिनें ती पेटी दिल्यावर मी ती तशीच हातांत घेतली. तेव्हां तिनें आपल्या गळ्यांतून वक्षप्रदेशावर रुळत असलेली एक माळ काढून आपली आठवण झणून माझ्या हातांत दिली व माझ्या हातांत असलेली हिन्याची आंगठी माझें स्मरण ह्मणून मागून घेतली. माझ्या हातांतील आंगठीचा खडा जरी अतीशय मौल्यवान् होता तरी जिनें आपले सर्व दागिने माझ्या हयालीं केले तिच्या प्रेमापुढे तो मला त्यावेळी केवळ गारगोटीसारखा भासला ष मी ती आंगठी देण्याबद्दल यत्किंचितही कुरकुर केली नाहीं ! ति सुचवल्याप्रमाणे लवकरच जाण्याची तयारी करतों असें मी तिला सांगितलें; आणि दोन तीन दिवसांनी एका विशिष्ट ठिकाणी भेटण्याचें तिनें मला वचन दिलें ! यावेळी आमची नाव परत येत होती. ती धक्यास लाग तांच नावाड्याचे पैसे दिले व प्रेमातिशयानें तिचा सुकुमार हात आपल्या हातांत धरून मी तिच्यासह धक्यावर आलों. वक्याच्या पाहिन्या चढून आली वर आलों तों तेथें दोन तरुण स्त्रिया आमची वाट पहात उभ्या आहेत असे मला दिसून आले. त्यांच्या- पैकीं एक गुजराथी व दुसरी युरोपियन होती. आझाला पहातांच त्यांनीं आमच्या सुखरूप येण्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे असे आपल्या स्मित वदनांनी दर्शविलें. आणि शिरीनूचा हात धरून