पान:मयाची माया.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग २ रा. णारा मी तिचें थोडक्याच काळांत चुंबनसुख अनुभविण्यास पात्र होईन असें जर एखाद्या ज्योतिषानें भविष्य वर्तवून मला सांगितलें असते तर मी त्याला वेडा झटलें असतें. इतकेच नव्हे तर अशा कुलीन घराण्यां- तल्या थोर स्त्रीविषयीं भलतेच उद्गार काढून तिच्या पश्चात् तिच्या नांवाला कलंक लावल्याबद्दल मी त्याची निर्भर्त्सना करण्यालाही तयार झालों असतों. इतकी असंभाव्य गोष्ट घडून आलेली पाहून मला माझ्या दैवाची व देवाची किती धन्यता वाटली असेल त्याची कल्पनाच केली पाहिजे ! 66 66 मी आनंदांत चूर होऊन अगरीं खुललों आहे असे पाहून त्या संब रीनें आपला कोमल हात माझ्या खांद्यावर ठेवून मला झटलें, प्रिय- करा, मी तुला मघा जी शराब दिली तिच्या योगानें तुझी उमिता बरीच कमी झाली आहे. तेव्हां ती आणखी एकवार प्राशन करून, मीं बरोबर आणलेले उपहाराचे पदार्थ सेवन कराल तर याहून जास्त हुषारी वाट ल्यावांचून रहाणार नाहीं. यावेळी मी तिचा बंदा गुलामच बनलों होतों. तेव्हां तिची आज्ञा मला शिरसा प्रमाणच होती. तिने आणलेले सर्व पदार्थ खाल्ल्यावर मला उद्देशून ती पुन्हा ह्मणाली " पिरोज, आतां मात्र तूं रोजच्यासारखा आनंदी दिसूं लागलास. आतां मीं जो मनांत बेत योजला आहे व ज्याकरितां ही एकांताची संधि आणली आहे तो तूं ऐकून घ्यावास अशी माझी विनंती आहे. एल, एयू, एस. च्या परीक्षेला तुला तिन्ही वेळेलाही यश आलें नाहीं व परीक्षा पास झाल्याशिवाय आपले हेतु सफळ होणे शक्य नाहीं. तेव्हां तूं विलायतेला जाऊन परीक्षा देऊन यावेस अशी माझी फार इच्छा आहे. आतां विलायतचा प्रवास करून येण्यास तुजजवळ पुरेसा पैसा नाहीं हे मला माहीत आहे. तथापि त्याचीही मीं व्यवस्था केली आहे. " असें ह्मणून तिनें जवळ असलेल्या बॅगमधून एक लहान पेटी काढिली व ती उघडून ती पुढे ह्मणाली, " मीं मोठें साहस करून माझ्या आईच्या ह्या चार हिन्याच्या बांगड्या बरोबर आणिल्या आहेत. ह्या व माझ्या हातांत असलेल्या दोन इतक्या मिळून तुझ्या प्रवासाची बेगमी होईल अशी माझी खात्री आहे. तेव्हां या घेऊन माझ्या घरच्या मंडळीस या गोष्टीची