पान:मयाची माया.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. १२१ • नांवचा जाड कागद माझ्या हाती येईल अशा रीतीने ठेवून शेवटीं चोरीचा मुद्देमाल माझ्यापाशींच सौंपडावा या हेतूनें चोरांनी लढविलेली युक्ति कोतवालसाहेबांच्या ध्यानांत आली. यानंतर कोतवालसाहेबांनी आह्मां सर्व मंडळींना एका चवळीवर नेलें. तेथे सर्वांच्या जवान्या घेऊन मला व मनुभाईला त्यांनी जावयास आज्ञा दिली; आणि त्या पाँची चोरांना मुद्देमालासह चवकीवर बसवून घेतलें. दुसरे दिवशी आपल्या जिनसा ओळखण्यासाठी कहानजीशेटजीना, व नोटांच्या नंबरांचें टिपण घेऊन मला व नंदशंकरशेटजीना त्यांनीं बालाविलें. पेटी, हिन्यांचों के कर्णे, मोत्यांची माळ, व पांचशे रुपायांच्या नोटा आणि हिन्याची अंगठी या जिनसांच्या मालकीबद्दलचा खात्री- लायक पुरावा आह्मांकडून मिळाल्यानंतर पांची चोरांवर कोतवालसाहे- बानीं रितीप्रमाणे खटला केला; व त्याचा निकाल होऊन चोरांना कडक शिक्षा देण्यांत आली. ही हकीकत एंकून सर्वांना मोठें आश्चर्य वाटले. नंदशंकरशेटजीनीं व मनभाईने मला वेळोवेळी केलेल्या उपदेशाचें महत्व आतां माझ्या चांगलं ध्यानांत आलें. मनुभाईनं व कोतवालसाहेबांनी वेळेवर सहाय्य केले नसते तर आज आपली कशी दुर्दशा उडाली असती है आतां मला पूर्णपणे कळलें; व इतःपर भलत्यासलत्या नादीं लागायचें नाहीं असा मीं दृढ निश्चय केला. संकटांतून माझी मुक्तता करण्याच्या कामी मला सहाय्य करणाच्या सद्गृहस्थांचे मी मनापासून धन्यवाद गाइले; आणि सर्वांचा निरोप घेऊन मी आपल्या गांवीं गेलो. असो. मंबई शहरांत चालू असलेल्या नानाविध व्यवहारांमध्ये अननुभवी, व किंचित् अविचारी अर्शी माणसें सहज गुरफटली जातात हे सर्वांना माहीत आहेच. इतरांप्रमाणे मला देखील ही गोष्ट चांगली ठाऊक होती. यासंबंधाने नंदशंकरशेटजीनीं व मनुभाईनें मला पुष्कळ उपयुक्त सूचना केलेल्या होत्या; तरी स्वतःच्या शहाणपणाची घमेंड, व तारु- प्याची ग अंगांत असल्यामुळे मी समजून उमजून अविचाराला- दुस- ज्याच्या तरुण स्त्रीचा अभिलाष धरून तिला वश करण्याच्या अत्यंत निग्र कल्पनेला बळी पडून स्वतःचा नाश करून घेण्याला कसा प्रवृत्त झाला होता है प्रांजलपणानें आपल्याला सांगितले आहे. खेडेगांवांतून अथवा लहानसहान शहरांतून प्रथमच मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक