पान:मयाची माया.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० प्रसंग १३ वा.

  • " बरं पण आतां कहानीशेटजींची ती पेटी, त्यांमध्ये ठेवलेल

हिन्यांचीं कंकणं आणखी मोत्यांची माळ कोठे आहे सांगा पाहूं लवकर. त्यांच्या येथें तीन दिवस गडी ह्मणून तूंच राहिला होतात ना ? " ल्यूडीजवळ जाऊन त्यांनी तिला प्रश्न केला. 66 नंदशंकरशेट जीपासून पांचशे रुपयांच्या नोटा मागून आणून तुझी या तुतच्या शिरीनला दिल्यात त्या कुर्डे आहेत बरं ? " कोतवालसाहे- "" बांनी मला विचारलें. त्यांचा हा प्रश्न ऐकत मी अतीशय लज्जिन झालों. शिरीन ही एक स्त्रीवे षधारी मयंकर चोर असेल या गोष्टीवर अजन माझा विश्वास बसेना ! मरा वाटे या अनाथ स्त्रियांवर हा भलताच आरोप करण्यांत येत आहे ! तेव्हां त्यांच्या निरपराधीपणाबद्दल आपण कोतवालसाहेबांची खात्री केली पाहिजे; पण इतक्यांत कोतवालसाहेबांनी नुकत्याच विचा रलेल्या प्रश्नाला शिरीननें स्वतःव उत्तर दिलें " महाराज, हिन्यांची कंकणं आणि मोत्यांची माळ माझी असून ती या चोरानें ( माझ्याकडे बोट दाखवून ) माझ्याजवळून हिसकावून घेतली व इकडे हा चोर पळून आला आहे ! ती पहा आपण ह्मगतां तसली पेटी त्याच्याजवळ आहे ! तीच कहानजींची पेटी असली पाहिजे ! अरे लच्चा ! आह्माल लुट्न- च्यालटून आणखी आमच्यावरच कुनांड घेतोस नाहीं ! पण साहेबांना सारं कांहीं कळलं आहे; आतां कुठे पळून जातोस पाहूं ! " तिच्या-नव्हे त्या स्त्रीवेषधारी भामट्याच्या तोंडांतून निघालेले हे शब्द कानी पडतांच एकाएकी माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली ! त्याची गांठ पडल्यापासून आतापर्यंत घडलेला सर्व वृत्तांत माझ्या ध्यानांत येऊन त्याच्या नादानें शेवटीं मी कसा दुः पडलों असतों हैं मला चांगलें समजड़ें. आपल्याला या संकटांतून वाचविण्याचे सर्व श्रेय मनुभाईकडे व त्याचे स्नेही कोतवालसाहेब यांच्याकडे आहे याबद्दल माझी खात्री झाली आणि सर्व हकीकत कोतवाउसाहेबांना कळवून त्या चोरांचा तेथल्यातेथें झाडा घेण्याविषयीं मी विनंति केली. त्याप्रमाणं त्यांनी केल्यावर सर्व जिनसा लागलीच सांपडल्या. कहानजी शेटजींची पेटी, एक खोटी माळ व तसल्याच प्रकारची एक अंटी आणि नोटांना गुंडाळलेला नंदशंकरशेटजींच्या