पान:मयाची माया.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ११९ पासून ती उपटण्याची पिरोजनें दष्टपणाने युक्ति केली आहे अशी मला शंका येऊन अंगठीबद्दलची सर्व हकीकत कांहीएक लाज न धरितां कोतवालसाहेबांना स्पष्टपणे सांगून टाकावी असे माझ्या मनात आले. पण अंगठी माझीच आहे अशाविषयीं कोतवालसाहेबांना खात्री वाटल्या- वरून पिरोजला ते ह्मणाले " हं; तुझं ह्मणणं अगदी खरं आहे ! चांदण्या- मुळे अंगठीबद्दल या गृहस्थाला जसा भ्रम पडला आहे तसाच तुलाही भ्रम झाल्यामुळे ही अंगठी वास्तविक या गृहस्थाची असून तिच्यावर तूं आपला हक्क सांगून ती उपटण्याचा विचार केला आहेस ! किती तरी बेटं हें चांदणं लबाड आहे हो ! निरनिराळे वेष घेऊन तुमच्यासारखें अट्टल चोर या गृहस्थासारख्या गावंढळ माणसांना भुलवून नागविण्याचा यत्न करीत असतांना तुझी भयंकर भामटे आहां ही गोष्ट हैं लबाड चांदणं गोरगरिबांना कळं देखील देत नाहीं ! " 66 66 'साहेब, " मी आतां लाजलज्जा एका बाजूला ठेवून पिरोजचा सूड उगविण्याच्या उद्देशाने कोतवालसाहेबांना ह्मणालों, ही अंगठी माझी स्वतःची असून ती दोन तीन दिवसांपूर्वी आह्मी आपोलोबंदरावर गेलों असतांना या शिरीनबाईपाशी दिली होती ! " शिरीन अंगठीसंबंधानें मी सांगितलेल्या हकीकतीचें समर्थन करील; झणजे पिरोजची लबाडी सहजच उघडकीला येईल अशी मला बळकट आशा वाटत होती. पण शिरीन माझ्यावतीनें कांहीँएक बोलली नाहीं. 60 66 66 दाः " कोतवालसाहेब शिरीनला उद्देशून ह्मणाले, तुझ्या या पारशीणीच्या वेषाला शिरीन है गोड नांव कसं छान शोभतं ! आणखी या दोवां चोरांनी कोणतीं नांवें घेतली आहेत ? तुलाला भिव- विण्यासाठी भयंकर मुखवटा घालून, हातांत एक मोठी थोरली काठी घेऊन आलेला पाजी माणस हाच नव्हे कां ? आतां हा साहेचीण बनला आहे काय ? " ल्यूसीकडे बोट दाखवून कोतवालसाहेब ह्मणाले. खंड दाखीवरे यांना त्या दोन्ही गाठोड्यातले ते या चोरांचे निरनिराळे वेष ! " आपल्या एका नोकराला कोतवालसाहेबांनी हुकूम केला. हे ऐकतांच खंडूने दोन्हीं गाठोडीं माझ्यापुढे आणून तीं मला सोडून दाखविली. त्यांत असलेले निरनिराळ्या प्रकारचे कपडे, व तहतऱ्हेच्या इतर कित्येक जिनसा पाहून तर मी अगदी थक्क होऊन गेलों !