पान:मयाची माया.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १३ वा. लावण्यासाठी मनुभाईनं आपल्याबरोबर आणलेले कोतवालसाहेब - मनु- भाईंचा मित्र- मला ह्मणाले " जरा गप्प राहिलां तर हे चोर कितपत निर- पराधी आहेत है थोडक्यांत तुम्हला पहायला सांपडेल. " " कायरे ए, ते चोरून आणलेले जिन्नस कोठें आहेत बोला लवकर ? चोरांना दरडावून कोतवालसाहेब ह्मणाले. ११८ पिरोजच्या डाव्या करंगळीत एक हियाची अंगठी, व माणेकच्या हातांत हिन्यांची कंकर्णे दिसत होतीं ती पाहून कोतवालसाहेबानीं त्यांना विचारले " ही अंगठी आणखी तीं कंकर्णे तुझी कोठून चोरून आणिलीत ? " " नाहीं महाराज, चोरून कशाची आणली !" माणेकबाईनें घिटाईनें उत्तर दिले " हीं तर माझ्या आईने मला दिली आहेत ! " आणखी पिरोज मध्येच मोठ्या आढचंतेनें ह्मणाला, " ही अंगठी तर माझी स्वतःची, ती स्वतः मिळविलेल्या पैशाने विकत घेतली आहे ! " अस्स काय !" तिरस्कार व्यक्त करणाच्या आवाजानें कोतवाल साहेव उद्गरले. " बरं, ते जिन्नस जरासे इकडे या पाहूं. ते नीट तपासल्यावर ज्याचे त्याला देण्यांत येतील. " असें ह्मणून कोतवालसाबाहेनी दोन्ही जिनसा त्यांच्यापासून घेतल्या; आणि अंगठी माझ्यापुढे करून त्यांनी मला विचारले " ही अंगठी तुमच्या पाहण्यांत आलेली आहे काय ? " " होय साहेब, " अंगठीकडे मी न्याहळून पाहिले; वती बोटांत घालून पाहिल्यावर ह्मणलों, “ ही तर माझीच आहे अशी मला खात्री वाटते. 66 66 " छे, महाराज " पिरोज मध्यंच ह्मणाला, " या चांदण्यांत ती त्यांना कशी ओळखणार ! बरोबर हिच्यासारख्या अंगठ्या पुष्कळ असतील. आणखी या गृहस्थांची असली एखादी अंगठी असली ह्मणून हीच त्यांची आहे असे कशावरून ? चांदण्यांत चांगले दिसत नाहीं त्यामुळे यांना अंगठीबद्दल भ्रम पडला असला पाहिजे ! " पिरोजचें हें ह्मणणं मला अगदीं लजाडीचें वाटलें; कारण तीच अंगठी माझी स्वतःची असल्याबद्दल मला मुळींच शंका नव्हती. दोन तीन दिव सांपूर्वी बंदरावर शिरीनला मी दिलेली तीच अंगठी होती; आणि तेव्हां- पासून शिरीनने ती आपल्या करंगळीत घालून ठेविली होती; पण आपल्या