पान:मयाची माया.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. या गृहस्थाचा आवाज ओळखीचा वाटल्यावरून मी न्याहाळून पाहू लागलों तो मनुभाई माझ्यापुढे येऊन उभा राहिला ! व " कां भगवानदास, भेटली कां एकदांची तुझी शिरीन ! " असे मल लवणाच्या हेतूनें ह्मणाला. " भलत्याच भानगडीत तूं सांपडला आहेस असे परवांपा-

  • सून मी तुला सांगत होतों, तरी तूं मला कांहीं पत्ता लागू दिला नाहींस;

पण ही सर्व हकीकत मी माझ्या मित्राला आज सकाळी कळविली. ते पहा, ते माझ्या परिचयाचे गृहस्थ तेथें उभे आहेत. गुन्ह्याचा तपास लावून त्यासंबंधी पुढील सर्व व्यवस्था करण्याचे काम सरकारने त्यांच्या- कडे दिले आहे. तेव्हां कांहीं एक चोरून न ठेवितां तूं आपली खरी- खरी सर्व हकीकत त्यांना सांग. निरनिराळी सोंगें घेऊन नादी लावणारे व शेवटीं तुझी दुर्दशा करूं पाहणारे हे भामटे किती अट्टल आहेत याची तुला कल्पनाही नाहीं. ती मोठमोठी दोन गाठोडी आणिली आहेत त्यामध्ये या चोरांचे तहत हेचे कित्येक वेष आहेत. कांहीं वेळापूर्वी त्यांचे आपसांत बोलणे चालले होते व आह्मी त्यांच्यापासून जवळच होतो त्यामुळे आझाला ते चांगले ऐकू आलें. आज या ठिकाणीं कांहीं तरी दगा होणार आहे हं काल संध्याकाळी मी तुझ्याबरोबर येथें आलों तेव्हांपासूनच ओळखून ठेविलें होतें; आणि ती बातमी आज सकाळीं मीं आपल्या मित्राला कळविली. कहानजीशेटजींच्या जिनसासंबंधाची चवकशी अगोदरच सुरू झालेली होती; व आज संध्याकाळपासून आह्मी चोरांच्या पाळतीवरच आहो. " मनुभाईनें सांगितलेल्या हकीकतीवर माझा विश्वास बसेना. या काम कांहीं तरी मोठी चूक झाली असावी असे अजून देखील मला वाटत होतें ! तिघी स्त्रिया - निदान एकटी शिरीन तरी - अगदी निरपराधी आहे असें शेवटी उरलें जावें यासाठी कांहीं तरी युक्ति योजण्याच्या विचारांत मी अगदी गढ़न गेलो होतों; व त्या भरांतच मी ह्मणालों या प्रकरणांत कांहीं तरी घोटाळा झाला असला पाहिजे आणि त्याचे प्रायश्चित्त निर पराधी माणसांना विनाकारण भोगावे लागणार आहे ! " .. " आपण ह्मणतां तें अगदीं अक्षरश: खरं आहे " त्या स्त्रियांपैकीं एकजण मला वाटते शिरीनच-ह्मणाली हैं ऐकतांच चोरीचा तपास