पान:मयाची माया.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. चंद्रप्रकाश, समोरील मुंबापुरीच्या एका अत्यंत मनोहर भागाचा देखावा, सागराचा एकांत, जवळ स्वर्गीगनातुल्य अशी कल्पनेतही प्राप्त न होणारी मोहक तरुणी आणि सर्व चिंतेचा लय करणारी, विवेकाचा नाश कर- णारी व मनावर पूर्ण स्वामित्व चालविणारी अशी जी भगवती मदिरा तिघ्या वश झालेला देह. ह्या सर्व गोष्टी ह्मणजे मदनाचे साम्राज्य सर्वथैव चालवण्यास अगदीं अनुकूल अशा स्थितींत त्या कोमलांगीसह त्या अनंत सागरांत नौकाक्रीडा करण्याचा हा माझ्या जन्मांत पहिलाच प्रसंग होता. त्या कारणानें मी काय करीत आहे, कोठें चाललों आहे, याचा परिणाम काय होईल इत्यादि गोष्टींचा विचारही मनांत न येतां मी निःशं- कपर्णे बसलों होतों. आमची नांव समुद्रांत बऱ्याच अंतरावर गेल्यावर मी कामातुर होऊन नवीन फुललेल्या गुलाब पुष्पावर झेंपावणाऱ्या भुंग्या- प्रमाणे बेहोष झाल्याने तिच्या अवरबिंबप्राशनाचा यथेच्छ उपभोग घेण्या- विषयीं मी अत्यंत उत्कंठित झालो होतों. फेट्मध्यें हिंडत असतां विजे- प्रमाणें तेथें अशी चमकणारी ही तरुणी कित्येक वेळा माझ्या नजरेस पढे त्यावेळी तिची सहजगत्या दृष्टी मजकडे वळलेली पाहून माझें मन आनंदाने उड्या मारूं लागे. पइराचा नुसता वायु लागला तर माझ्या शरीरांत नवीन प्राणवायू शिरल्याप्रमाणें माझें चैतन्य द्विगुणित होई. तिची ती वेलींना आणि लतांनाही नृत्य शिकवणारी चाल पाहून हिच्या चरणीं लोटांगण घ्यावें अशी इच्छा उत्पन्न करी. तिचें पंचम सुरांतलें भाषण माझे पंचप्राण व्याकुळ करी. परंतु ही तरुणी अशारीतीनें मला प्राप्त होईल हें माझ्या स्वमाही नव्हतें. ज्याप्रमाणे नित्यशः शहरांतून जातांना अनेक विलासवती युवती पाहून आपल्या विषयलोलुप मनाला क्षणमात्र वेड लागतें व क्षणार्धीत आपण त्यांची आठवण विसरून जातों त्याप्रमाणेच तिचें तें दर्शन क्षणमात्र चटका लावून स्मृतिशेष होईल अर्सेच त्यावेळी माझ्या मनाला वाटले. पुन्हा कारंज्याजवळ गांठ पडली त्यावेळी त्यांतील विजेच्या दिव्यांची प्रभा तिच्या मनोहर मुखावर पसरली असतां व तिच्या नेत्रकिरणांनी माझे प्राण आकर्षून घेतले असतां इंद्राच्या अप्सरेप्रमाणे भासणारी त्यावेळची तिची मूर्ति पाहून तिनें तीन, चार वेळ आपल्याकडे पाहिलें याच्या योगानें स्वत:ला कृतकृत्य मान- २