पान:मयाची माया.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १३ वा. लागला; पण आमच्यापुढे त्याचं कांहीं चालत नाहीं असं पाहून तो पळून गेला " असे वारंवार मोठ्या दीनस्वरानें ह्मणत होते ! 66 त्यांना घरून आणणारी माणसे त्यांच्या विनवण्यांचा मुळींच विचार करीत नाहींत असे पाहून मला फार वाईट वाटलें. त्यांना पकडण्या- मध्ये कांहीं तरी चूक झाली असावी असे माझ्या मनांत आलें ! पिरोजला घरलेला पाहून मात्र मला समाधान झाले; पण शिरीन आदि- करून बाकीच्या मंडळींची मला अतीशय दया आली. " ल्यूसी आल्याचें शिरीन माझ्यापाशी बोलली होती; पण त्याचवेळीं माणेक, पिराजी व पिरोज तेथें कसे व कां आले है मला समजले नाहीं. त्यांची विचारपुस करें- ण्याची कांहीं ती वेळ नव्हती ह्मणून मी त्या नादी लागलों नाहीं. पण पिगेज खेरीज करून बाकीच्या मंडळींनी या अकल्पित संकटांतून सोडवि ण्याचा यत्न करावा असे त्या स्थितीत त्यांना पाहतांच माझ्या मनांत आलें. आतां शिरीन, ल्यूसी, व माणेक एकाएकी ओकसाबोकशी रहूं लागल्या ! हे पाहून माझें अंतःकरण इतकें द्रवलें कीं, माझ्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागल्या ! त्या तिघी स्त्रियांना सोडण्या- विषयीं मी त्यांना धरून आणणारांची करुणा भाकणार तोंच त्यापैकी एक गृहस्थ पकडलेल्या माणसांना दरडावून ह्मणाला " हरामखोरांनो, आह्मी तुझाला चांगले ओळखले आहे. आज कित्येक दिवस आह्मी तमच्या पाळतीवरच आहों ! आपलीं सोर्गे मघाशीं तिकडच्या झाडाआड उभे राहून तुझी बदलीत होता तेव्हांपासून आह्मी तुमच्या पाठोपाठच येत आहों ! चोला आतां कहानजीटजींची पेटी, हिग्यांचीं कंकर्णे, आणखी मोत्यांची माळ कुठे ठेविली आहेत ती ! " हे त्याचें बोलणे ऐकन मी तर अतीशयच विस्मित होऊन गेलों ! हें एकंदर वर्तमान काय आहे याचा मला मुळींच उमज पडेना, ! शिरीनला, ल्यूसीला व माणेकला चुकीनें चोर समजून त्या गृहस्थांनीं विनाकारण त्यांच्यावर हे संकट आणले आहे असे मला अजूनही वाटत होतें; आणि त्याच्या वतीनें भी कांहीं बोलणार तोंच त्या मंडळींच्या मागून एक गृहस्थ येत होता तो ह्मणाला " येवढ्यानें भागत नाहीं; पाचशें रुपयांच्या नोटा व एकाची आंगठीदेखील यांच्याचपाशी आहे. "