पान:मयाची माया.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १२ वा. झणाली " खरंच पिरोज, ही माळदेखील माझ्या आईचीच आहे हो ! कंकणांच्या पेटीबरोबरच ही माळदेखील मी तुझ्यासाठी चोरूनच आणिली आहे ! आणखी ती सुद्धां उद्यांच्या उद्यां मला आईपाशीं नेऊन दिली पाहिजे ! ” हे तिचे शब्द ऐकतांच मी बराच गोंधळून गेलों; वती माळ तिला देऊं नये असे मला वाटू लागले; पण ती वस्तु तिचीच असून ती ज्याअर्थी इतक्या प्रेमानें आपल्यापाशी मागत आहे त्याअर्थी नाहीं झणणें हें कांहीं चांगले नाहीं असे वाटून ती घेण्या विषयी मी तिला आपली संमती दिली; आणि तिने आपल्याच हातानें ती चटकन् काढून आपल्या गळ्यांत घातली. तिच्या इच्छेप्रमाणे माळ तिला द्यावी कीं नाहीं याबद्दल माझ्या मनाचा त्यावेळी जो घोंटाळा होऊन गेला होता त्याचे कारण कांहीं वेगळंच होतं. त्यादिवशी संध्याकाळी हँगिगंगार्डनमध्यें शिरीनला भेट- ण्यासाठी नंदशंकरशेटजींच्या घरून मी निघण्यापूर्वी त्यांच्याकडे आलेल्या कहानजीशेटजींच्या बोलण्याचे मला एकाएकीं स्मरण झाले. कंक- णाचद्दल व पेटीबद्दल नंदशंकरशेटजीपार्शी त्यांनी जे कांहीं सांगि- तलें होतें तें मीं चांगलें ऐकलें होतें, पण ते दोघे घरांतून बाहेर जातांना त्यांचे जे कांहीं बोलणं चाललें होतें त्याकडे. शिरीनला भेटण्यासाठी. मी मनस्वी उतावीळ होऊन गेल्यामुळे माझे फारसे लक्ष नव्हते; तरी कहानजीशेटजींच्या तोंडून " मोत्यांची माळ " असे शब्द निघालेले आपण ऐकले आहेत असे मला वाटले. पण त्याचा संबंध ध्यानांत न आल्यामुळे मी त्यांचा विचार न करितां हँगिगंगार्ड- नकडे जाण्याची तयारी करण्यासाठी चट्कन् माडीवर निघून गेलों ! मोत्याच्या माळेबद्दलची हकीकत यावेळीं एकाएकी मला आठवली व शिरीनने ती माळ आपल्यापासून अगोदरच परत घेतली असूनही नोटा, पेटी व माळ नीट जपून ठेवण्याविषयीं तिनें कां सांगितलें याचें मला मोठे आश्चर्य वाटलें ! पण माळ तिच्याचपाशी आहे ही गोष्ट ती जाण्याच्या गर्दीमध्ये कदाचित् विसरली असेल अशी कल्पना करून मी त्या गोष्टीचा फारसा विचार केला नाहीं. पेटी व नोटा नाहींशी झाल्यामुळे यावेळी माझ्या मनाला मोठी हुरहुर लागून राहिली होती; व्