पान:मयाची माया.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १२ वा. पळवून नेणार ! पण आपणच जर त्याच्याशीं मारामारी करून शिरी- नला सोडवून नेली तर ? छे, इतक्या मजबुद माणसापुढे आपल्या सारख्याचे काय चालणार ! पण पहाका थोडासा यत्न करून असे मनांत येऊन मी त्याच्या हाताला हिसका देण्याच्या बेतांत होतो; पग ही गोष्ट अगोदरच त्याच्या लक्षांत येऊन त्याने माझा हात कहिल्या- पेक्षां अधिक जोराने दाबून धरला ! व आपली काठी जमीनीवर टाकून एका हाताने त्यानें माझे तोंड घट्ट दाबून धरि आणि माझ्या अंगावर मोठ्यानें ओरडून तो झाला खबरदार ओरडलास तर ! आतांच्या आता प्राणाला मुकशील !" इतक्यांत त्याची चर्या एकाएकी कावरी- बावरी होऊन गेल्यासारखी दिसूं लागली. हे पाहतांच मला मोठं आश्चर्य वाटलें, व किंचित् समाधानही झाले. वास्तविक पाहिले तर त्या ठिकाणी मी, शिरीन व तो जंगली मनुष्य या तिळांवांचून त्यावेळी कोणीही नव्हतें. आमच्यापासून बऱ्याच अंतरावर दुसरी कोणी माणसे असली तरी मला निदान तो त्यावेळी माहीत नव्हती. अशा स्थितीत आह्मी दोघांपेक्षा कितीतरी बलवान् व धाडसी असलेल्या त्या रानटी मनुष्याची चर्या ययभीत होण्याचें कांहीं कारण नव्हते; आणि यामुळेच मला त्या गोष्टीचा मोठा चमत्कार वाटला. याला कोणाची तरी चाहूल लागल्यामुळेच हा असा कावगबावरा होऊन गेला असावा, व आतां कदाचित् तो येथून पळून गेला तर आपल्यावरील संकट अनायासँच नाहींस होईल. या कल्पनेने मला किंचित् आनंद झाला होता. माझा हात सोडून तो मनुष्य आतां तीक्ष्ण दृष्टीने आपल्या आसपास पाहू लागला. तोंच आमच्या पुढल्या बाजूने कोणी तरी तीन माणसें येत आहेत असे मला वाटलं. ती माणसे मोठ्या झपाट्याने आमच्याकडे येत होती. तो लांच होती तोपर्यंत त्यांच्याबद्दल कांहींच अनुमान करीतां येईना; पण जवळ जवळ येतांच तीं कोण असावों यासंबंधानें मला. कल्पना येऊं लागली. ते तिवही पुरुष होते व त्यांना मी. बऱ्याचवेळां पाहिले आहे असं मला वाटू लागले ! ते आमच्या जवळ येतांच शिरीन मोठमोठ्यानें हंसूं लागली. त्यापैकी एकाला तर मी चांगलेंच ओळखिलें! मग त्यांना पाहतांच शिरीन का हंसली हे मात्र मला समजले नाहीं.