पान:मयाची माया.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १२ वा. १०: लागलों व शिरीनच्या हातांतून ती पेटी आपल्या हातांत घेतली. तोंच माझ्या महगल्या बाजूनें एक इसम मोठ्या कर्कश आवाजाने ' अरे हरामखोरा, आतां पेटी घेऊन जातोस कुठे ! एक पाऊल टाकलेंस कीं, तुझी शंभर वर्षे भरलींच ह्मणून समज ! असे ओरडून माझ्या अंगावर धावून आला ! प्रसंग १२ वा. -S त्या माणसानें उच्चारलेले हे भयंकर शब्द कानीं पडतांच मी एकाएकी अगदीं गर्भगळीत होऊन गेलों ! माझे सर्व अवसान गळून गेलें; व शरी- राला एकदम दरदरून घाम फुटला. भयाने हातपाय लट्लट कार्पू लागले. आपला कांहीएक अपराध नसतांना आपल्यावर चालन येणारा हा माणूस आहे तरी कोण हे मार्गे वळून पाहण्याचें देखील धैर्य माझ्यामध्ये उरलें नाहीं. मग असल्या त्या अडदांड, जंगली पशुवर चाल करून जाण्याचें नांव कशाला ! आतां तो भयंकर मनुष्य माझ्यापुढं येऊन उभा राहिला ! त्याला पाह- तांच मला एकदम घेरी येऊन माझे डोळे मिटले; पण त्या जंगली माण- सानें माझा हात धरितांच मी सावध झाली व त्याच्याकडे भीत भीत पाहूं लागलों ! त्याचें तें भीषण स्वरूप- त्याचा काळाकुट्ट काजळ फांसल्या- सारखा चेहरा, ते धिप्पाड मजबुद उघडे बंत्र शरीर र माझ्या डोळ्यापुढे मधून मधून आले झगजे अजूनही त्याची मला भीति बाटल्यावांचून रहात नाहीं ! त्याच्या उजव्या हातांत एक भली मोठी थोरली काठी होती; आणि तिच्या एका बाजूला भाल्याच्या टोंकासारखे कांहीतरी बसविल्यासारखं दिसत होते. ती काठी त्यानं आपल्या डाव्या हातांत घेतली व उजव्या हाताने माझा हात वरिला. हा एकंदर भयंकर प्रकार पाहून शिरीनही बरीब भयभीत होऊन गेली असावी असे दिसत होतें; तरी पण आश्चर्य असे कीं, ती आपल्या जागेवरून यत्किंचितही हलली नाहीं ! हा दांडगा मनुष्य बहुतकरून