पान:मयाची माया.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया.. दहा हजार रुपये घेऊन येईन. अग, दहा हजार रुपड्यांची बिशाद ती काय ! तुझ्या प्रेमासाठीं, तुझ्या सुखासाठी मी पाहिजे तसलं साहस करा- यला आतां मार्गे पुढे पाहणार नाहीं. पण माझ्या ठिकाणी जडलेलं तुझं प्रेम मात्र असंच टिकलं पाहिजे ह्मणजे माझ्या जन्माचे सार्थक झालं असं मी समजेन ! " असें ह्मणून मी तिच्या हाताचे चुंबन घेतलें ! पण लागलीच, आपण हैं भलतेच बोलून गेलों असें मनांत येऊन मला पश्चात्ताप वाटू लागला ! कंकणांच्या पेटीवरील अक्षराविषयींची शंका आतां माझ्या मनात एक- दम उद्भवून पेटी इतक्यांत आपण तिला उगीच दिली असे वाटलें, व तिला त्या अक्षराबद्दलची कांहीं माहिती असल्यास पहावी ह्मणून मीं तिला विचारले " शिरीन, या तुझ्या पेटीच्या वरच्या बाजूला आणखी आंतल्या अंगाला काही इंग्रजी अक्षरें खोदलेली आहेत ती तुला माहीत आहेत कां ? " “ ह्मणजे !" तिरस्कारसूचक आवाजाने ती उद्गारली, माझ्याच नांवांची ती अक्षरें-- एम, एस, ह्मणजे 'मिस शिरीन " - असून ती मला माहीत आहेत कां ह्मणून काय विचारतां ? मी कांहीं ही पेटी दुसऱ्या कोणाच्या घरून चोरून आणिली नाहीं. ही माझ्या बाबांनीं माझी हिग्यांची कंकर्णे ठेवण्यासाठी ह्मणून मुद्दाम तयार करविलेली आहे. कां, तुझाला त्यांत इतकं आश्चर्य कसलं वाटलं ? "

  • 6

' छे, ह्मणण्यासारखं आश्चर्य नाहीं कांहीं त्यांत ! पण मी तुला अशी विनंति करीतों कीं, ह्री पेटी आजच्या दिवस तूं माझ्याजवळच राहू दे; कारण तिच्याबद्दल थोडीशी भानगड उत्पन्न झाली आहे; तेव्हां मी झातों की, थोडक्यासाठी कशाला उगीच भलत्याच यातायातीत पडा ! त्या पेटीसंबंधानं आपल्यावर आज उद्यां केव्हांना केव्हां तरी कांहीं भयंकर अरिष्ट येणार अशी मला फार भीति वाटत आहे. ह्मणून ती निदान आज तरी तूं नेऊं नको. " असें ह्मणून मी तिच्या हातामधून ती पेटी ( तिच्या मर्जीविरुद्ध ) घेऊं लागलों तच आमच्यापासून थोड्या अंतरावर कांही कुजबुजल्याचा आवाज माझ्या कांनी आला ह्मणून तिकडे मी आपली दृष्टी वळवून पाहूं